ताज्या घडामोडी

समतोल नवदुर्गा भाग~ 4

Spread the love

उदे ग अंबे उदे असे जेव्हा आपण म्हणतो अर्थात तेव्हा आपल्या डोळ्यासमोर माता माऊली उभी राहते अशीच एका समतोल च्या माता माऊलीची माहिती नवदुर्गा भाग 4 मधुन घेणार आहोत तिचे नाव आहे रंजना रजपूत …
*रंजना मँडम या समतोल मधील वयस्कर वयाने जरी असल्या तरी त्यांची एनर्जी एखाद्या तरूण वयात येणाऱ्या काँलेज च्या मुलींसारखी असते .रंजना मँडम म्हणजे आँलरांउडर प्लेअर आहे कोणत्याही प्रकारचे काम असु द्या नाही हा शब्द त्यांच्या डायरीत अजून तरी सापडला नाही प्रंचड उत्साह असलेले व्यक्तीमहत्त्व म्हणजे रंजना रजपूत*
..*नावावरून आपल्या लक्षात आले असेल त्या मध्यप्रदेश मधून आहे खरतर त्या अशा भागातून आल्या आहेत जिथे खुप झाडी हिरवेगार आणि डोंगर आहेत असे प्रसिद्ध पचमढी पर्यटन स्थळ त्यामुळे त्या नेहमीच आनंदी असतात रंजना मँडम या सर्व प्रकारच्या भुमिका तंतोतंत करतात परंतु एखादी प्रेमळ नर्स ची भुमिका खूप छान निभावतात म्हणून गेली अनेक वर्षे म्हणजे साधारण 12 वर्षे एक तप केल्याप्रमाणे त्यांनी जी मुले स्टेशनवर भेटल्यानंतर शेल्टर मध्ये काळजी व सरंक्षणासाठी आणली जात होती त्यांना संभाळण्याचे कठीण काम करीत होत्या व करत आहेत रंजना मँडम खरतर शिक्षित ग्रुहिणी आहेत जुन्या ग्रज्युएट आहेत त्यामुळे त्या शिक्षिका सुद्धा आहेत घरातील परिस्थिती मुळे त्यांचे सुद्धा लग्न तसे लवकरच झाले वडिलांनी दोन बायका केल्यामुळे एका ऐवजी दोन आईच्या प्रेमाने त्या जास्त भावनिक सुद्धा झालेल्या असतात**नवरा मुलगा मुंबई मध्ये आहे नोकरीला आहे म्हणून त्यांचे लग्न पटकन लावले गेले रंजना मँडम म्हणजे घरातील चौकटीत काम करणाऱ्या महिला होत्या
*नवीन शहरात आल्यानंतर त्यांना अनेक संघर्षाचा सामना करावा सर्वात अगोदर इथे असणारी मराठी भाषा शिकावी लागली नवरा कोळी बांधवांच्या सहवासात राहत असल्याने मांसाहार करीत असे एक तर त्यांना मांसाहारी जेवण बनवायला येत नव्हते ते शिकावे लागले रंजना मँडम पुर्ण पणे शुद्ध शाकाहारी आहेत तरीही त्यांनी ते स्विकारले आणि संसार सुखाचा केला थोड्या प्रमाणात नवरा नशा सुद्धा करीत असल्याने त्यांना खूप त्रास सहन करावा लागला पुढे मागे नवरा ज्या कंपनीत कामाला होता ती कंपनीच बंद पडली त्यामुळे आर्थिक परिस्थिती डळमळीत झाली शिवाय* *सोबतीला दोन मुले होतीच त्यांचे शिक्षण व इतर खर्च होता त्यामुळे आता नोकरी केल्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता यामध्ये मुलगा नेहमीच आजारी असायचा त्यामुळे त्यांना नेहमीच त्याची काळजी वाटत होती मुलगी हुशार व चंचल असल्याने घरातील काही गोष्टी ती करत होती त्यामुळे तीचा आधार होता रंजना मँडम यांनी ठरवले होते की आपल्याला काम असे करायचे की मुलांना घेऊन करायचेआपल्या मुलाला होणाऱ्या त्रासाला मी ज्याप्रकारे बघते तशीच इतर मुलांना होणाऱ्या किंवा असणाऱ्या समस्या मी बघेल अशी जणु मनात निश्चय करूनच त्या बाहेर कामासाठी पडल्या होत्या* *त्यावेळी नुकतीच चाईल्ड हेल्पलाइन सुरू झाली असल्यामुळे रंजना मँडम सुद्धा त्या ठिकाणी लागुन गेल्या सपना श्रीवास्तव आणि रंजना मँडम या खास मैत्रीण होत्या ज्यावेळी सपना बाहेर चाईल्ड लाईन मधून पडली तेव्हा रंजना मँडम सुद्धा बाहेर हळूहळू येण्यासाठी प्रयत्न करीत होत्या सुरवातीला समतोल चे आँफीस दादर मध्ये होते त्यामुळे अनेक कार्यकर्ते संस्थेला भेट देऊन जात होते याच दरम्यान आम्हाला मुले ठेवण्यासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये एक गाळा माननीय आयुक्त नंदकुमार जंत्रे साहेब यांनी देण्याचे आश्वासन दिले होते शेल्टर मिळवून देण्यासाठी खरे सुत्रधार मा.संजयजी केळकर साहेब होते 2008 मध्ये ही हालचाल झाली आणि शेल्टर समतोल साठी मिळुन गेले आजपर्यंत 14 वर्षे झाली संजयजी केळकर साथ देत आहेत त्यामुळे ते आमचे एक प्रकारे आधार स्तंभच आहे आणि म्हणूनच ते आज संस्थेचे अध्यक्ष सुद्धा आहेत कारण त्यामागे त्यांची तळमळ, आपुलकी आणि बालप्रेम आहे हे विसरून चालणार नाही* रंजना मँडम च्या रूपाने मुलांना भावनिक प्रेम, काळजी घेणारी माता माऊली हवी होती ती आता समतोल ला मिळाली होती
वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, समस्या, जाती,धर्म ,खानपान ,आणि बरेच काही त्यामुळे मुलांना शेल्टर मध्ये बांधून ठेवणे खूप अवघड प्रक्रिया असते हे एक दैवी शक्ती असल्याशिवाय सहन करणे शक्य नाही त्यामुळेच या सर्व समतोल साठी दैवी देणगी घेऊन आलेल्या देवी आहेत
*रंजना मँडम यांच्या मधील खास गुण म्हणजे समुपदेशन होय कोणताही मुलगा किती वेळ खोटा बोलला तरी खरी माहिती काढून घेण्याची कसोटी त्यांनी शिकली आहे तसेच कार्यकर्ते यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना नेहमीच दिलचस्पी असते प्रत्येकाच्या आयुष्यातील चढ उतार ऐकताना त्या लगेचच भावुक होतात आणि रडतात कधी कधी यांच्या डोळ्यात एवढे पाणी कसे आणि कुठुन येते याचा आम्हाला अजूनही शोध लागलेला नाही परंतु आता वयानुसार अनेक गोष्टीत त्यांनी स्वतः मध्ये बदल घडवून आणला आहे आज वयाच्या 60 कडे जाताना सुद्धा त्यांना कोणी मावशी अंटी म्हटले तरी त्यांना आवडत नाही कारण उत्साह टिकून आहे* *याचा आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो शेल्टर, शिबिर, स्टेशन किंवा अन्नछत्र असो नेहमीच त्या पुढे असतात मला वाटते 10.000/ पेक्षा अधिक मुलांना त्यांनी संभाळले असावे अशा या माता माऊली जेव्हा आजारी पडतात तेव्हा त्यांनी केलेले समतोल साठी कष्टाची नक्कीच जाणीव होते समतोल आणि त्यांचे एक परीवारीक नाते तयार झाले आहे त्यामुळे काठी हातात येईपर्यंत मी समतोल मध्येच काम करेल असे आवर्जून सांगतात.. अशा या माऊलींच्या मनात कामाबद्दल खूप मनापासून प्रेम आहे जेव्हा समतोल वर कोणी आरोप करतात तेव्हा त्या पदर खोचून उभ्या राहतात रेल्वे स्टेशन वर परवानगी मिळावी म्हणून आम्ही इतक्या वर्षे धडपडत आहोत हे बघुन देवी ला साकडे घालतात जागर मातेचा करतात आणि म्हणतात
!!बये आता तरी दार उघड बये आता तरी दार उघड!!
*समतोल फाऊंडेशन*
*अध्यक्ष श्री संजय केळकर सोबत विजय जाधव एस.हरीहरण व संपूर्ण समतोल टिम*
धन्यवाद!!!!@ 9892961124

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!