आपला जिल्हा

सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग; ३ सिलेंडरचा स्फोट तर २८ सिलेंडर जळाल्याची घटना

Spread the love

पुणे : आज दिनांक १५ रोजी सकाळी साडेदहा वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सुस गाव येथे शेल पेट्रोल पंपाजवळ बेलाकासा इमारत येथे असलेल्या कामगारांच्या झोपड्यांना आग लागल्याची वर्दि मिळताच पुणे अग्निशमन दलाकडून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औंध, पाषाण, कोथरुड, वारजे येथील अग्निशमन वाहने तसेच एक वॉटर टँकर आणि पीएमआरडीए दोन अग्निशमन वाहन व वॉटर टँकर व हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन वाहन अशी एकुण ०९ वाहने रवाना करण्यात आली होती.

घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी पञ्याचे शेड असलेल्या झोपड्यांना मोठी आग असल्याचे जवानांनी पाहिले व तातडीने प्रथमत: आतमध्ये कोणी अडकले आहे का हे पाहत आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व आग इतरञ इतर झोपड्यांमध्ये पसरु नये याची विषेश खबरदारी घेऊन सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणत पुढील धोका दुर केला. सदर आगीमध्ये तीन घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन आग भडकल्याचे निदर्शनास आले. तसेच घटनास्थळी घरगुती वापराचे छोटे मोठे असे एकुण २८ सिलेंडर जळाले. यामध्‍ये  अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणीही जखमी वा जिवितहनी झालेली नाही. कामगारांच्या एकुण ५० झोपड्या असून २० झोपड्या जळाल्या तर इतर ३० झोपड्यांना दलाच्या जवानांनी हानी होऊन दिली नाही. कामगारांच्या झोपड्यातील घरगुती साहित्य व गृहोपयोगी वस्तू पुर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, शिवाजी मेमाणे, कमलेश सनगाळे व सुमारे तीस-चाळीस जवानांनी आगीवर नियंञण मिळवत पुढील अनर्थ टाळला.

“आमच्या जवानांनी वेळेत पोहोचत आग इतरञ पसरु न देता मोठा धोका टाळला. सिलेंडर मोठ्या प्रमाणात असल्याने जर त्यांचा ही स्फोट झाला असता तर मोठी हानी झाली असती. जवानांच्या तत्परतेमुळे मोठी घटना टळली.”देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!