ताज्या घडामोडी

पुण्यात येरवाडा येथे साऊंड तयार करणारा कारखाना व गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Spread the love

पुण्यात येरवडा येथे एका साऊंड तयार करणाऱ्या कारखान्याला आणि गोडाऊनला भीषण आग लागली असून या आगीत मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना येरवडा येथील विडी कामगार वसाहत येथे घडली.

येरवडा येथे विडी कामगार वसाहत येथे एका कारखान्याला आणि गोडावूनला आग लागली असल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. या घटनेची तातडीने दाखल घेऊन अग्निशमन दलाने धानोरी, येरवडा, नायडू व मुख्यालयातून दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच निदर्शनास आले की, तळमजला आणि वरचा मजला असलेल्या इमारतीत तळमजल्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये साऊंड बॉक्स बनविण्याच्या कारखान्यात भीषण आग लागली होती. तसेच शेजारीच असलेल्या गोडाऊनमध्ये ही आग पसरली होती. जवानांनी तातडीने आतमध्ये कोणी आहे का याची तपासणी करत एक कामगार सुखरुप बाहेर पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर आगीवर सातत्याने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आग इतरत्र कोठे ही पसरु नये याची खबरदारी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.

त्यावेळी तिथे असलेल्या तीन दुचाकी वाहनांना आगीची झळ बसल्याने त्या आगीत भस्मसात झाल्या. बाजूला असलेल्या एका इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर देखील आगीत जळला. घटनास्थळी खाजगी वॉटर टँकर व जेसीबीची मदत घेण्यात आली होती. आगीमध्ये कोणी ही जखमी नसून यामध्ये इलेक्ट्रिक साहित्य, मशीनरी, लाकडी सामान असे साहित्य पुर्ण जळाले. अग्निशमन अधिकारी सोपान पवार, विजय भिलारे, सुभाष जाधव, तसेच तीस-चाळीस जवानांच्या मदतीने आग आटोक्यात आणत धोका दुर करण्यात आला. आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!