महाराष्ट्र

१५ ऑगस्ट पासून मॉल्स, हॉटेल, जिम रात्री १० पर्यंत सुरू राहणार

Spread the love

मुंबई : राज्यभरातील मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट १५ ऑगस्ट पासून रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. धार्मिक स्थळे व सिनेमागृह मात्र पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगलकार्य व उपहारगृहांना क्षमतेच्या ५० टक्के व खुल्या लॉनमध्ये होणाऱ्या सोहळ्यांना दोनशे जणांना परवानगी देण्यात आली आहे. दुकानेही रात्री 10 पर्यत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!