आरोग्य व शिक्षण

सरकारी लालफितीच्या कारभाराला कंटाळून नितीन मराठे यांनी स्वखर्चाने केले काम

Spread the love

तळेगाव : सरकारी खात्याच्या लालफितीच्या कारभाराला कंटाळून जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी वराळे फाटा रस्त्याचे काम स्वखर्चाने सहा लाख रुपये खर्च करून केले.

वराळे फाटा चौकातील रस्ता खूप खराब झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी नितीन मराठी प्रयत्नशील होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तगादा लावून रस्ता दुरुस्तीची मागणी त्यांनी केली. ग्रामपंचायतीने या बाबतीत पत्र व्यवहार केले .मात्र अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे मिरवत दीड वर्ष वेळकाढूपणा केला. कामासाठी लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊनही निधी उपलब्ध झाला नाही.

मावळात झालेल्या प्रचंड पावसामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालताना व वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत होती. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.  त्यामुळे व अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे फंड उपलब्ध होत नसल्याने अखेर जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी स्वखर्चाने काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पदरमोड करून सहा लाखांचा निधी देत रस्त्याचे काँक्रिटीकरण करून प्रत्यक्ष काम सुरू केले.

सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने रस्ता –

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम होईल अशी अपेक्षा संपली होती. रस्ता खूप खराब झाल्याने वृद्ध नागरिक, महिलांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून मी स्वखर्चाने रस्ता केला असे नितीन मराठे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!