ताज्या घडामोडी

अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या लोणावळ्यातील हॉटेल बैठक ढाबा ला आयपीएस सत्यसाई कार्तिक यांचा जोरदार दणका

हॉटेल मालकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल, हुक्क्यासाठी लागणारा सुमारे पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

प्रतिनिधी श्रावणी कामत 

लोणावळा: लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. तसेच श्री सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा विभागातील सर्व आस्थापना चालक यांनी त्यांना नेमून दिलेल्या नियमांचे व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे आव्हान केले होते. तरीही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असून लोणावळा ग्रामीण पो.स्टे हद्दीतील हॉटेल बैठक ढाबा या हॉटेलमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालत असल्याची खात्रीशीर माहिती श्री सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्याआधारे दिनांक 16/03/2024 रोजी मध्यरात्री श्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह हॉटेल बैठक ढाबा, जुना मुंबई पुणे महामार्ग, कार्ला, तालुका, मावळ, जिल्हा पुणे

याठिकाणी छापा टाकला असता हॉटेलचालक हे सदरचे हॉटेलमधेच अवैध हुक्का पार्लर चालवून ग्राहकांना अवैधपणे हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे मिळून आल्याने त्याठिकाणी विक्रीसाठी असलेला हुकक्यासाठी लागणारे पॉट, तंबाखुयुक्त फ्लेवर्स, फिल्टर, पाइप ई. असा एकूण 44,790 रु./- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पो.ना सचिन गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पो.स्टे येथे इसम नामे 1) कृष्णा नाथा राठोड, वय 31 वर्षे, रा.लोणावळा कालेकरमळा, दत्त मंदीरासमोर लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे, 2) प्रताप कृष्णा डिंमळे वय 42 वर्षे, व्यवसाय हाटेल मालक, रा. कार्ला, ता. मावळ, जि.पुणे, 3) बिपीन्छु मार परमेश्वर महतो, वय 30 वर्षे, रा. भारती अपार्टमेंन्ट फ्लॅट नं.202 साईबाबा मंदीराजवळ शांतीनगर उल्हासनगर,ठाणे यांचेविरोधात सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वित्तरण, विनीमय) अधिनियम 2003 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) व 21 (अ) सह भादवि कलम 188, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, पोसई शुभम चव्हाण, पोसई रोहन पाटील, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना. सचिन गायकवाड, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अंकुश पवार, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ काळे, पो.कॉ टकले, पो.कॉ माळवे, पो.कॉ पवार, म.पोकॉ चवरे, म.पोकॉ शिंदे यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!