आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात;

अंगणवाडी सेविकांचे आमदार सुनिल शेळके यांना निवेदन..

Spread the love

महाराष्ट्र सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात; अंगणवाडी सेविकांचे आमदार सुनिल शेळके यांना निवेदन..Maharashtra government should accept our demands; A statement to Anganwadi Sevak MLA Sunil Shelke. 

आवाज न्यूज : मावळ वार्ताहर, २५ फेब्रुवारी.

महाराष्ट्र सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी मावळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आमदार सुनिल शेळके यांना निवेदन दिले. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरू होत असणाऱ्या विधानसभेच्या बजेट अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले.

दरम्यान, वारंवार मागणी करूनही मागण्या पूर्ण होत नसल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात तालुक्यातील बहुतांश अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या असून मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांना सुमारे पाचशे अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांनी आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

काय आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या !

१)अंगणवाडी कर्मचारी या शासनाच्याच सेवक असल्याने त्यांना शासकीय कर्मचारी दर्जा, शासकीय वेतन श्रेणी व अन्य सर्व लाभ लागू करावे.
२) सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार ग्रॅज्युएटी देणे.
३) सेवा समाप्ती लाभ रक्कम सेवा समाप्त झालेल्या सेविका रुपये एक लाख व मदतनीस रुपये पंच्याहत्तर हजार मागील चार वर्षांपासून मिळाला नसल्याने तो त्वरित देऊ करावा.
४) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन लागू करावी.
५) कुपोषित बालकांसाठी तीन पट तर सामान्य मुलांसाठी दुप्पट आहार रकमेत तातडीने वाढ करावी.
६) भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या अंगणवाड्यांसाठी मासिक भाडे रुपये साडे सातशे वरून वाढवून सहा हजार रुपयांपर्यंत करावे.
७) ऑनलाईन कामासाठी उच्च प्रतीचा मोबाईल तसेच माहिती भरणा करायचा ‘पोषण ट्रॅकर ॲप’ हा राज्य भाषेत करावा.

 

 

वेळोवेळी शासनाला सांगूनही आम्हाला न्याय मिळत नसल्याने आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. आझाद मैदानावर राज्यभरातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन सरकारचे लक्ष वेधणार आहोत.
अनिता कुटे (अध्यक्षा. अंगणवाडी संघटना मावळ)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!