ताज्या घडामोडी

भविष्याचा वेध घेत असताना निरोगी जीवन जगण्यासाठी योग विद्या आत्मसात करा

Spread the love

प्रथमेश क्षीरसागर -इस्लामपूर प्रतिनिधी
इस्लामपूर ता.१६ भविष्याचा वेध घेत असताना निरोगी जीवन जगण्यासाठी योग विद्या आत्मसात केली पाहिजे याचबरोबर मोबाईल टी.व्ही या व्यसनाच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर घडवावे असे मत गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले. ते येलूर ता.वाळवा येथील हायस्कूल प्रांगणात उभारलेल्या संकेत माणिकराव जाधव सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाळवा शिक्षण संस्थेचे मानस सचिव अॅड बी एस पाटील अध्यक्षस्थानी होते. तर सहसचिव धैर्यशील पाटील गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार ,माजी नगराध्यक्ष प्रा.अरुणादेवी पाटील, सरपंच विनायक महाडिक प्रमुख उपस्थित होते यावेळी अॅड पाटील म्हणाले -येलूर हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक एम एल जाधव सरांनी त्यांच्या दिवंगत चिरंजीवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ या सभागृहाची उभारणी केली.या सभागृहात होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी उपक्रमातून संकेत च्या स्मृती जागृत राहातील . यावेळी तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे संचालक संदीप जाधव, राजन महाडिक, लक्ष्मी उद्योग समूह येडेनिपाणी चे अध्यक्ष आनंदराव पाटील ,चेतन जाधव भाऊ ,भगवानराव जाधव, धनाजीराव गायकवाड, बाळासाहेब जाधव, भास्करराव जाधव, मुख्याध्यापक एस एल पाटील ऍंड अशोकराव पाटील उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले सूत्रसंचालन उत्तम शिणगारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!