ताज्या घडामोडी

धुळवडीनिमित्त पुणे मेट्रोची (Pune Metro) प्रवासी सेवा सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

दुपारी २ ते रात्री १० या वेळेत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू राहणार असल्याची माहिती ‘महामेट्रो’कडून देण्यात आली.

Spread the love

पुणे : येत्या सोमवारी (दि. २५ मार्च) धुळवडीनिमित्त पुणे मेट्रोची (Pune Metro) प्रवासी सेवा सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ ते रात्री १० या वेळेत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू राहणार असल्याची माहिती ‘महामेट्रो’कडून देण्यात आली.

येत्या सोमवारी धुलीवंदन अर्थात धुळवड आहे. या निमित्ताने पुणे आणि पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात रंग खेळले जातात. मेट्रोच्या प्रवासादरम्यान रंग खेळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टेशन आणि मेट्रोच्या डब्यांमध्ये रंग खेळले जाऊन अस्वच्छता होऊ शकते.

स्वच्छतेवर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रोने सोमवारची फेऱ्यांची वेळ बदलली आहे. मेट्रोची दैनंदिन वेळ सकाळी ६ ते रात्री १० अशी असते. मात्र, धूलिवंदनानिमित्त सोमवारी दुपारी २ ते १० अशी वेळ बदलण्यात आली आहे. वेळेतील बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!