ताज्या घडामोडी

५५ वी पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा यजमान महाराष्ट्राचे पुरुष व महिला संघ उपांत्य फेरीत

Spread the love

महाराष्ट्राचा पुरुषांमध्ये कोल्हापूर विरुध्द तर महिलांमध्ये दिल्ली विरुध्द लढा

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

उस्मानाबाद, (क्री. प्र.) महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो खो स्पर्धेत डावाने विजय मिळवण्याची विजयी परंपरा कायम राखत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला पुरुषांमध्ये कोल्हापूर विरुध्द तर महिलांमध्ये दिल्ली विरुध्द लढा द्यावा लागणार आहे.

भारतीय खोखो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहे. आहेत.

आज झालेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर १६-८ असा एक डाव ८ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. यात महाराष्ट्राचे निहार दुबळे (५ गुण), रामजी कश्यप (१.४० मि. संरक्षण व ४गुण), प्रतिक वाईकर ( २.१० मि. संरक्षण व ३ गुण), लक्ष्मण गवस (१:५० मि. संरक्षण), ऋषिकेश मुर्चावडे ( १:३० मि. संरक्षण) व दिलीप खांडवी (२ मि. संरक्षण) यांनी केलेल्या जोरदार खेळीमुळे महाराष्ट्राला मोठा विजय सहज शक्य करता आला. ओडिशाच्या जगन्नाथ मुर्मू (१ मि. संरक्षण व २ गुण) याची एकाकी खेळी अपुरी पडली.

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राच्याने केरळचा १०-७ असा एक डाव ३ गुणांनी धुव्वा उडवत पराभव केला. महाराष्ट्राकडून स्नेहल जाधवने ४ गुण मिळविले. अपेक्षा सुतार (३ मि. संरक्षण), अश्विनी शिंदे व रुपाली बडे (प्रत्येकी २.५० मि. संरक्षण), संपदा मोरे (२.१० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (३.१० मि. संरक्षण), प्रियांका इंगळे व काजल भोर (प्रत्येकी १.४० मि. संरक्षण) यांनी संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. केरळकडून आदित्या (१.४० मि. संरक्षण व १ गुण) व प्रीथी (२ गुण) यांची खेळी अपयशी ठरली.
——-
रेल्वे व कोल्हापूरही उपांत्य फेरीत

पुरुष गटात रेल्वे, कर्नाटका व कोल्हापूरने तर महिला गटात भारतीय विमान प्राधिकरण, दिल्ली व ओरिसा या संघानेही उपांत्य फेरी गाठली. पुरुष गटात रेल्वेने आंध्र प्रदेशचा १९-८ असा ५.४० मिनिटे राखून पराभव केला. रेल्वेकडून अरुण गुनकी (३ मि. संरक्षण व २ गुण) याने अष्टपैलू खेळ केला. निलेश पाटीलने आक्रमणात ४ गुण मिळविले. दुसऱ्या एका सामन्यात राजवर्धन (२ व २.३० मि. संरक्षण) व मनोज (३ गुण) यांच्या शानदार खेळीमुळे कोल्हापूरने पश्चिम बंगालला १४-१३ असे एक डाव १ गुणाने पराभूत केले. आणखी एका सामन्यात कर्नाटकने केरळला १४-१३ असे एक मिनिट राखून नमविले.

महिला गटात विमान प्राधिकरण संघाने गुजरातला ९-८ असे ६.३० मिनिटे राखून नमवले. एम. वीणा ( ३.३०, २.५० मिनिटे संरक्षण व २ गुण) व रूपाली (४ गुण) ही त्यांच्या विजयाची मानकरी ठरली. अन्य सामन्यात दिल्लीने हरियाणावर ११-१० अशी बाजी मारली. ओरिसाने कर्नाटकावर ८-६ असा डावाने विजय मिळविला
———
असे होतील उपांत्य लढती : पुरुष : रेल्वे-कर्नाटक, महाराष्ट्र-कोल्हापूर. महिला : महाराष्ट्र-दिल्ली, भारतीय विमान प्राधिकरण-ओरिसा.

फोटो : पुरुष – महाराष्ट्र वि ओडिशा व महिला – महाराष्ट्र वि केरळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!