ताज्या घडामोडी

लोणावला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी पोरवाल यांच्या भाकड धमक्यांना न जुमानता पोरवाल यांचे अतिक्रमण केले उद्ध्वस्त ..

पोरवाल यांनी मुख्याधिकारी अशोक साबळे यांचे विरुद्धच खटला भरण्यात यावा अशी मागणी करीत चक्क, भर रस्त्यात चादर अंथरुन त्यावर झोपून राडा घालण्याचा केला प्रयत्न..

Spread the love

लोणावला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी पोरवाल यांच्या भाकड धमक्यांना न जुमानता पोरवाल यांचे अतिक्रमण केले उद्ध्वस्त ..

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत २४ नोव्हेंबर.

लोणावळ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता प्रकाश मिश्रीमल पोरवाल हे अडीच तीन वर्षे पुर्ण प्रयत्न करुन देखील स्वत:च्या इंद्रायणी नदीवरअडथळा ठरणारा बेकायदेशीर भराव टाकून व नदीवरअतिक्रमण करुन चुकीच्या पद्धतीने केलेल्या बांधकामावर राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरण यांनी आदेश देउन देखील तत्कालीन मुख्याधिकारी पंडीत पाटील हे कारवाई करीत नसल्यामुळे गोरगरीबांचा मिळकत कर स्वरुपात गोळा केलेल्या पैशाचा वापर नगरपालीका दंड स्वरुपात भरुन आजचे मरण उदयावर टाळत होती.

आत्तापर्यंत नगरपालीकेने स्वतःच्या कामचुकारपणामुळे व कुणाच्या धमक्यांना घाबरुन सडेतोड कारवाई न केल्यामुळे न्यायालयाने अंदाजे रक्कम रुपये २१ लाखापर्यंत एवढा दंडठोठावला असून सदर कार्रवाई पुर्ण होईपर्यंत दररोज रुपये २५००० – अशी ही वाढीव दंडाची रक्कम नगरपालीकेवर ठोठावली आहे.

वेळेवर कर न भरु शकणा-या गोरगरीबांच्या घरांवर जप्ती किंवा इतर कायदेशीर कार्रवाई करणा-या नगरपालीकेच्या भोंगळ कारभार करणाऱ्या प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे जनतेच्या कर स्वरुपात गोळा केलेल्या रकमेची ही वाताहत म्हणावी लागेल.

नवीनच कार्यभार स्वीकारलेले लोनावला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी मात्र पोरवाल यांच्या भाकड धमक्यांना न जुमानता पोरवाल यांचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले असता पोरवाल यांनी मुख्याधिकारी अशोक साबळे यांचे विरुद्धच खटला भरण्यात यावा अशी मागणी करीत चक्क भर रस्त्यात चादर अंथरुन त्यावर झोपून त्यास राडा घालण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न लोणावळा उपविभागीय पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व पोलिस निरीक्षक डुबल यांनी हाणून पाड़ला.

झालेल्या या कार्रवाईनंतर सरकारी अधिकारी व कर्मचारी तसेच सर्वसाधारण नागरिक यांचेमध्ये कायदा व सुव्यवस्था आहे असा विश्वास निर्माण झाला आहे. सदर संपूर्ण कारवाई वर लोणावळेकर नागरिकांचे लक्ष आहे.नवीनच कार्यभार स्वीकारलेले मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी मात्र तीन वर्षे प्रलंबित, पालिकेला खड्डयात टाकणारी कारवाई त्वरित केल्याने आणि लाखो रूपये एका व्यक्तीच्या बेकायदेशीर भराव काढण्याचे कामाला प्राथमिकतेने सोडवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!