आर्थिक/ बॅंकिंगताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी अभ्युदय सहकारी बँक लिमिटेडचे ​​संचालक मंडळ १२ महिन्यांसाठी बरखास्त केले आहे.

Spread the love

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी अभ्युदय सहकारी बँक लिमिटेडचे ​​संचालक मंडळ १२ महिन्यांसाठी बरखास्त केले आहे .The Reserve Bank of India (RBI) on Friday dismissed the board of directors of Abhyudaya Sahakari Bank Limited for 12 months;

आवाज न्यूज : प्रतिनिधी, २४ नोव्हेंबर.

अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे. एका वर्षासाठी आरबीआयने अभ्युदय बँकेच्या बोर्डाचं निलंबन केलं आहे. आरबीआयने सत्य प्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून अभ्युदय बँकेवर नियुक्ती केली आहे. खराब प्रशासनामुळे बँकेच्या बोर्डावर कारवाई करण्यात आल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. प्रशासकांना त्यांची कर्तव्य पार पाडताना मदत करण्यासाठी आरबीआयने सल्लागार समितीचीही नियुक्ती केली आहे. व्यंकटेश हेगडे (माजी महाव्यवस्थापक, SBI), महेंद्र छाजेड (सीए) आणि सुहास गोखले ( माजी एमडी कॉसमॉस बँक) हे सल्लागार समितीचे सदस्य आहेत.

बँकेचं बोर्ड निलंबित करण्यात आलं असलं तरी बँकेचे रोजचे व्यवहार सुरू राहणार आहेत, त्यामुळे ग्राहकांना बँकेत पैसे टाकता येणार आहेत, तसंच बँकेतून पैसे काढताही येणार आहेत. बँकेतल्या ग्राहकांच्या गुंतवणुकीवरही कोणताच परिणाम होणार नाही, असं आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बँकेच्या रोजच्या कामकाजावर आरबीआयने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत.

अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेची सुरूवात 1964 साली झाली होती. पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीने बँकेचा पाया रचला गेला. बँकेची सुरूवात दूध व्यवसाय आणि छोटा व्यापर करणाऱ्यांसाठी करण्यात आली होती, यानंतर जून 1965 साली अभ्युदय बँक सुरू झाली. 1988 साली आरबीआयने बँकेला शेड्युल बँकेच्या कॅटेगरीमध्ये टाकलं. यानंतर बँकेच्या शाखा मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये सुरू झाल्या. बँकेने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्येही शाखा सुरू केल्या.
को ऑपरेटिव्ह बँक म्हणजे काय?

छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सहकारी बँकांची सुरूवात झाली. खासकरून ग्रामीण भागात बचत आणि गुंतवणुकीची सवय वाढावी, यासाठी सहकारी बँकांची स्थापना करण्यात आल्या. या क्षेत्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असूनही, एकूण कृषी कर्जामध्ये त्याचा वाटा 1992-93 मधील 64 टक्क्यांवरून 2019-20 मध्ये केवळ 11.3 टक्क्यांवर घसरला.या बँकांचं रजिस्ट्रेशन को ऑपरेटिव्ह सोसायटीकडे केलं जातं. सध्या भारतात 1482 को ऑपरेटिव्ह बँका आहेत, ज्यात 8.6 कोटी जनतेचे 4.84 लाख कोटी रुपये जमा आहेत.

मध्यंतरीच्या काळात बँकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची “प्रशासक” म्हणून नियुक्ती केली आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी अभ्युदय सहकारी बँक लिमिटेडचे ​​संचालक मंडळ १२ महिन्यांसाठी बरखास्त केले आहे. परिणामी मध्यंतरीच्या काळात बँकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची “प्रशासक” म्हणून नियुक्ती केली आहे.

आरबीआयने प्रशासकाला त्याच्या कर्तव्याचे पालन करण्यास मदत करण्यासाठी “सल्लागारांची समिती” देखील नियुक्त केली आहे. “सल्लागार समितीच्या सदस्यांमध्ये व्यंकटेश हेगडे (माजी महाव्यवस्थापक, SBI), महेंद्र छाजेड (चार्टर्ड अकाउंटंट) आणि सुहास गोखले (माजी एमडी, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड) यांचा समावेश आहे,” असंही RBI ने एका निवेदनात म्हटले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!