कृषीवार्तामहाराष्ट्रसामाजिक

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी व सचिव यांची कोल्हापूर येथे कार्यशाळा संपन्न.

Spread the love

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी व सचिव यांची कोल्हापूर येथे कार्यशाळा संपन्न.

आवाज न्यूज : प्रतिनिधी,२५ नोव्हेंबर.

कोल्हापूर दि.२४.महाराष्ट्र राज्य कृषि मंडळ पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था,तळेगाव दाभाडे, जि. पुणे(NIPHT)यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर  रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांची पणनविषयक कार्यशाळा संपन्न झाली.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता  निलकंठ करे जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांचे शुभहस्ते बाजार समित्यांचे सभापती यांचे उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी  किरण पाटील जिल्हा लेखा परीक्षक, डॉ.सुभाष घुले उपसरव्यवस्थापक,विभागीय कार्यालय पणन मंडळ, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था बिपीन मोहिते, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे  सभापती,उपसभापती, संचालक व इतर सर्व सहकारी सचिव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. सुभाष घुले यांनी नामदार अब्दुल सत्तार मंत्री, पणन यांचे संकल्पनेतून व  संजय कदम, कार्यकारी संचालक व  विनायक कोकरे सर व्यवस्थापक, कृषि पणन मंडळ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांचे करिता एक दिवसीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

सदर कार्यशाळेच्या निमित्ताने पणन संबंधित महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके यांची पुस्तिका तयार करण्यात आलेली असून ती पुस्तिका बाजार समित्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व सचिवांना बाजार समितीचे कामकाज करताना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.सदर कार्यशाळेत कृषि पणन कायदा व त्यामधील महत्त्वाच्या सुधारणा याबाबत  नीलकठ करे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बाजार समितीचे अधिकार व कर्तव्य याबाबत, बिपीन मोहिते यांनी मार्गदर्शन केले.केंद्र शासनाच्या कृषि पणन विषयक असणाऱ्या विविध योजनासंबंधी ऋग्वेंद्र मुरगोड,उप कृषी पणन सल्लागार मुंबई यांनी मार्गदर्शन केले शेतमालाची निर्यात व कृषि पणन मंडळाचे योगदान याबाबत  मिलिंद जोशी उप सर व्यवस्थापक, यांनी मार्गदर्शन केले तसेच बाजार समित्यांसाठी असणाऱ्या पणन मंडळाच्या विविध संगणक प्रणाली यासंदर्भात कैलास फटांगरे,व्यवस्थापक संगणक यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे सभापती उपसभापती व समिती सदस्य व सचिव उपस्थित होते यावेळी बाजार समितीच्या रँकिंगमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आलेल्या कोल्हापूर कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती भारत पाटील आणि सांगली जिल्ह्यातून पहिला क्रमांक आलेबद्दल आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांचे व त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ आणि सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे शेवटी  प्रतीक गोनुगडे यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!