अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

भोसरीतील संत निरंकारी सत्संग भवनात रविवारी बाल समागम उपक्रम.ताराचंद करमचंदानी

Spread the love

भोसरीतील संत निरंकारी सत्संग भवनात रविवारी बाल समागम उपक्रम…Child Samagam activities at Sant Nirankari Satsang Bhavan in Bhosari on Sunday…

आवाज न्यूज :  पिंपरी प्रतिनिधी, २७ मे.

सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे रविवारी पुणे झोन चा बाल समागम सकाळी ११ ते २ या वेळेत संपन्न होणार आहे. या बाल समागम ला पुणे झोन मधून १५०० हुन अधिक लहान बालक उपस्थित राहणार आहेत.

सुसंस्कारित मुले उत्तम समाज निर्माण करू शकतात त्यासाठी मुलांचा बौद्धिक, मानसिक, आध्यात्मिक विकास होणे गरजेचे आहे. मुलांना शिक्षणाबरोबर चांगल्या संस्काराची गरज आहे, हे संस्कार केवळ संतांच्या सानिध्यात मिळत असतात म्हणून निरंकारी सत्संगच्या माध्यमातून असे विशाल बाल संत समागम आयोजित केले जातात.

या बाल समारोहामध्ये लहान-लहान मुल अवतारवाणी गायन, हरदेव वाणी गायन, कवी दरबार, नाटिका,गीत, विचार यां द्वारे सदगुरु चा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवून आशीर्वाद प्राप्त करतील. या सत्संग सोहळ्याला संत निरंकारी मंडळाच्या वतीने अम्रितपाल सिंह (गुजरात) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते उपस्थित बालकांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रमुख) यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!