आपला जिल्हाक्राईम न्युजमहाराष्ट्र

कॉप्स व्यापारी असोसिएशनची  स्थापना.आदम बेग.

ट्रेंडमार्क, कॉपीराईट च्या नावाने होणाऱ्या त्रासाबाबत व्यथा मांडली. यापुढे कॉप्स संघटना व्यापाऱ्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून कायद्याने लढा लढण्यास तत्पर असणार..

Spread the love

कॉप्स व्यापारी असोसिएशनची  स्थापना.आदम बेग.

ट्रेंडमार्क, कॉपीराईट च्या नावाने होणाऱ्या त्रासाबाबत व्यथा मांडली. यापुढे कॉप्स संघटना व्यापाऱ्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून कायद्याने लढा लढण्यास तत्पर असणार आहे.Establishment of Copse Traders Association.Adam Baig.Concerned about the trouble caused in the name of trendmark, copyright. Henceforth the cops association is ready to fight the law through the organization for the traders a

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, २७ मे.

कॉप्स व्यापारी असोसिएशनची  स्थापना करण्यात आलेली आहे. पिंपरी येथील अनेक व्यापाऱ्यांनी कॉप्स चे सदस्यत्व स्वीकारले आहे व त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या ट्रेंडमार्क, कॉपीराईट च्या नावाने होणाऱ्या त्रासाबाबत व्यथा मांडली. यापुढे कॉप्स संघटना व्यापाऱ्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून कायद्याने लढा लढण्यास तत्पर असणार आहे.

कॉपीराईट आणि ट्रेडमार्क च्या नावाखाली व्यापान्यांकडून लाखो रुपये खंडणीच्या मार्फत उकळण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत, खंडणी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांवर दबंगगिरी ? कॉप्स व्यापारी असोसिएशनची पोलीसआयुक्तांकडे तक्रारीवरून कॉपीराईट आणि ट्रेडमार्क च्या नावाखाली पिंपरी-चिंचवड शहरामध्ये व्यापाऱ्यांना धमकी देणाऱ्या टोळी बद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये कॉप्स व्यापारी असोसिएशन मार्फत ईमेल द्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महेंद्रसिंग आणि महेश कांबळे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांना हाताशी धरून कॉपीराईट आणि ट्रेडमार्कच्या नावाखाली व्यापान्यांकडून लाखो रुपये उकळत असल्याचे समोर येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. विशेष म्हणजे कॉप्स व्यापारी असोसिएशनच्या सभासदांना कॉपीराईट आणि ट्रेडमार्क च्या नावाखाली व्यापाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून दर महिन्याला हफ्त्याची मागणी करण्यात आली आहे.

 

याविषयी कॉप्स व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आदम बेग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कॉपीराईट ट्रेडमार्क कायद्याअंतर्गत एस ओ पी 9 ऑक्टोंबर 2021 च्या नुसार उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी. कॉपीराईट आणि ट्रेडमार्क च्या नावाखाली संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करून माल जप्त केला जातो मात्र पोलीस अधिकाऱ्याकडून कायद्याचे उल्लंघन करत गुन्हे दाखल केले जातात. कलम 103, 104 नुसार माल जप्त केला जातो. कायदा 1957 नुसार चुकीच्या पद्धतीने पोलीस दप्तरी गुन्हा दाखल केला जातो. विशेष म्हणजे गुन्हा दाखल न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाणीची मागणी केली जाते आणि यासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. मागील महिन्यामध्ये पिंपरी कॅम्प, काळेवाडी, सांगवी भोसरी आदी भागांमध्ये स्थानिक पोलीस स्टेशनला हाताशी न धरता खंडणी विरोधी पथकामधील पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी खंडणी गोळा करण्यात येत आहे.

कारवाई करताना संबंधित व्यापाऱ्याचे येथील सीसीटीव्ही फुटेज बंद केले जातात. सीसीटीव्ही फुटेज बंद करण्याचा अधिकार कायद्याने कोणालाही दिलेला नाही. तरीपण खंडणी विरोधी पथकातील अधिकारी आणि कॉपीराईट ट्रेडमार्क च्या नावाखाली वसुली करणारे एजंट यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये धुमाकूळ घातला आहे. कारवाई करताना 115 ( 4 ) नुसार सुप्रिडेंट किंवा सक्षम दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांनुसार   ही कारवाई केली जाते. स्थानिक पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायाला हाताशी धरून ही बेकायदेशीर कारवाई करून व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्यांच्या मार्फत संबंधित व्यापाऱ्यांना आण्णा से माल नही लेना वर्णा तुम्हारे दुकान पे रेड मारकर सब बंद कर दिया जायेगा मग हा अण्णा कोण? असा प्रश्न निर्माण झाला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आयुक्त याची तातडीने चौकशी करावी कॉपीराईट आणि ट्रेडमार्क च्या नावाखाली खंडणी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हप्ता वसुली करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा कॉप्स व्यापारी असोसिएशन तर्फे बेमुदत बाजारपेठ बंद केली जाईल. अशी माहिती अदम बेग यांनी आवाज न्यूजला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!