अध्यात्मिकआपला जिल्हाऐतिहासिकदेश विदेशसामाजिक

रमाईचे स्मृतिस्थळ राष्ट्रीय स्मारक व्हावे.. मा. नगराध्यक्षा ॲड.रंजना भोसले.

होती रमा म्हणून घडले भिमा असे म्हटले जाते. त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मृतिस्थळाबाबत अनेकांना माहिती नसल्याचे लक्षात आले.

Spread the love

रमाईचे स्मृतिस्थळ राष्ट्रीय स्मारक व्हावे.. मा. नगराध्यक्षा ॲड.रंजना भोसले.Ramai’s memorial should be a national monument. Hon. Mayor Ad.Ranjana Bhosale.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २७ मे.

माता रमाईआंबेडकर स्मृती स्थळ दुर्लक्षित असून त्याच्या विकासाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तर्फे येत्या शनिवारी २७ ला मावळातील सुमारे ७०० आंबेडकर प्रेमी वरळी मुंबई येथील माता रमाई स्मृती स्थळाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत.

होती रमा म्हणून घडले भिमा असे म्हटले जाते. त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मृतिस्थळाबाबत अनेकांना माहिती नसल्याचे लक्षात आले.

संस्थेने माता रमाईये स्मृतीस्थळ सर्वांना माहीत व्हावे आणि तेथे त्यांचे स्मृतीदिनी म्हणजेच दि. २७ मे या दिवशी दरवर्षी तेथे सर्वांनी अभिवादन करण्यासाठी जावे, या ठिकाणाचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी माता रमाई यांच्या जीवनावरील व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा, पुस्तक प्रकाशन घेण्यात येणार आहेत. वरळी मुंबईतील स्मृति स्थळाच्या विकासासाठी शासन, प्रशासन आणि जनजागृती करण्यासाठी विविध क्षेत्रातील अभ्यासू आणि प्रतिभासंपन्न लोकांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. रमाईचे स्मृतीस्थळ हे राष्ट्रीय स्मारक व्हावे व त्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी ठरावाद्वारे करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

त्यामुळे माता रमाई आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म वर्षा निमित्त समितीने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी गुरुवारी, आयोजित पत्रकार परिषदेत समितीच्या अध्यक्ष ॲड. रंजना भोसले यांनी माहिती दिली. यावेळी किसन थूल, प्रा. एल. डी. कांबळे, संजय गायकवाड, दिनेश गवई, भागवत बि-हाडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!