आपला जिल्हासामाजिक

भोई प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती अलका कुबल यांचा ; येरवडा महिला कारागृहातील महिलांकरिता सुसंवाद कार्यक्रम संपन्न !

अलका कुबल यांनी सर्व महिला बंदी तसेच महिला अधिकारी-कर्मचार्यांशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधला.

Spread the love

भोई प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती अलका कुबल यांचा ; येरवडा महिला कारागृहातील महिलांकरिता सुसंवाद कार्यक्रम संपन्न !On behalf of Bhoi Pratishthan, Pune, well-known actress Mrs. Alka Kubal; Harmony program for women in Yerwada women’s jail completed!

आवाज न्यूज : पुणे, प्रतिनिधी २७ मे.

सुधारणा व पुनर्वसन या धोरणांतर्गत कारागृहातील बंद्यांकरिता अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. भोई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने कारागृह उपमहानिरीक्षक- स्वाती साठे यांच्या संकल्पनेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांचा महिला कारागृह येथे महिला बंद्यांकरिता सुसंवाद कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री  अलका कुबल यांनी महिला बंद्यांना महिला सबलीकरण बाबत तसेच महिलांनी खचून न जाता जिद्दीने संकटांचा सामना करून परत नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन करून महिलांना मानसिक आधार दिला तसेच सर्व महिला बंदी तसेच महिला अधिकारी-कर्मचार्यांशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधला.

या कार्यक्रमास येरवडा कारागृह अधीक्षक.अनिल खामकर,उपअधीक्षक. पल्लवी कदम, तुरुंगाधिकारी. तेजश्री पोवार, भोई प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष डॉ.मिलिंद भोई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!