ताज्या घडामोडी

न्यूझीलंडमध्ये महाराष्ट्रीयन कुटुंबांच्या गणेशोत्सवात मुंबईतील चाळीचा देखावा

Spread the love

मूर्तीऐवजी सुपारीचे विसर्जन

मुंबई – गणेशोत्सव हा सण भारत देशातच नव्हे तर साता समुद्रापलीकडे न्यूझीलंड मध्ये ही धुमधडाक्यात साजरा होताना दिसतो.महाराष्ट्रातील नागपूर,पुणे आणि मुंबई आदि ठिकाणच्या २० कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन न्युझीलंडच्या न्यूप्लायउथ शहरात गेल्या चार वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. यंदा या मंडळींनी मुंबईतील चाळीचा देखावा उभारून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे

गणेशोत्सवात रोज संध्याकाळी भजन, नृत्य,लोकगीत,भारतीय परंपरा आणि संस्कृती जोपसण्यासाठी पारंपारिक वेशभूषा आदि स्पर्धा आयोजित केल्या जातात.

मुंबईतील प्रतिक पवार यांच्या गरेज मध्ये पुण्यातील राजू खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.महाराष्ट्रातील अमोल ठाकरे,प्रतिक पवार,राजू खाडिलकर, आनंद नूलकर,महेंद्र परदेशी, प्रतिक भावसार ,हितेश पाटील,अमित चिटणीस, प्रशांत मोरे,अमरीश
खानोलकर,रोहिणी राव,करण लोखरे,यश जोशी, साई राणे आणि किशोर ओधेकर ही महाराष्ट्रीयन कुटुंबे हा आपला गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा करताना दिसतात. न्यूझीलंडमध्ये तलाव किंवा नदीमध्ये मूर्ती विसर्जन करण्यास परवानगी मिळत नाही.त्यामुळे गणेशमूर्तीच्या जागी प्रातिनिधिक स्वरुपात छोटी मूर्ती किंवा सुपारीचे विसर्जन केले जाते.दहा दिवस हा गणेशोत्सव साजरा केला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!