ताज्या घडामोडी

पारधी समाजाचे पुनर्वसन करा अन्यथा पाटबंधारे विभागाच्या इमारती ताब्यात घेणार -प्रा.मधुकर वायदंडे यांचा इशारा

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
पारधी समाजाचे प्रश्न तत्काळ सोडवून आठ दिवसात पुनर्वसनाची ठोस अंलबजावणी करावी अन्यथा पाटबंधारे विभागाच्या वापरात नसलेल्या इमारती पारधी समाज ताब्यात घेणार असा इशारा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व पारधी हक्क अभियानाचे नेते प्रा.मधुकर वायदंडे यांनी दिला आहे.
पारधी समाज्याच्या पुनर्वसनासाठी शिराळा तहसिल समोर सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या बेमुदत राहुटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते नागमणी शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रा.वायदंडे म्हणाले,दलित महासंघाच्या वतीने पारधी पुनर्वसनासाठी गेली 20 वर्ष महाराष्ट्रभर लढा चालू आहे पारधी सामाज्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 2003 साली 14 मोस्ट वाँटेड पारधी बांधवांचे सांगली येथे आत्मसमर्पण घडवून आणण्यात आले होते. परंतु ज्या वाळवा व शिराळा तालुक्यातून या लढ्याला सुरवात झाली होती त्याच तालुक्यातील प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पारधी समाजाचे पुनर्वसन रखडले आहे पारधी समाज सर्व योजनांपासून वंचित राहिला आहे.
वायदंडे म्हणाले,ज्या लोकांना गावे दिलेली आहेत त्या लोकांना अद्यापही घरकुलाचा किंवा इतर कोणताही लाभ मिळालेला नाही. अजूनही काही लोक उघड्यावर राहत आहेत अशा लोकांचे गावामध्ये पुनर्वसन होणे गरजेचे आहे . प्रत्येक वेळी प्रशासनाने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे.परिणामी पारध्यांना गावातून हाकलण्याचे प्रकार चालू आहेत. यासाठी पारधी पुनर्वसनाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून ठोस अमलबजावणी करण्याची गरज आहे.पारधी मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
पारधी पुन्हा गुन्हेगारीकडे वळला तर त्याला जबादार कोण ?असा सवाल वायदंडे यांनी केला आहे.
पारधी समाजाच्या संपूर्ण पुनर्वसना बाबत कोणताही ठोस निर्णय न झालेस बेमुदत राहुटी आंदोलन अधिक तीव्र करून येत्या आठ दिवसात शिराळा तालुक्यातील मणदूर,कोकरूड,मांगले,शिराळा येथील पाटबंधारे विभागाच्या इमारती पारधी समाज ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रा.वायदंडे यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेवेळी युवक आघाडी अध्यक्ष मा.सुधाकर वायदंडे,प.महा कार्याध्यक्ष शशिकांत नांगरे,जि.कार्याध्यक्ष नागनाथ घाडगे, दिनकर नांगरे,संभाजी मस्के,टारझन पवार,राकेश काळे,सौ.रोशना पवार,गुलछडी काळे,
चार्जिंग पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!