ताज्या घडामोडी

मंदिराबाहेरील रांगा वाचनालयाबाहेर दिसतील तेव्हा खऱ्याअर्थाने आदर्श समाज निर्माण होईल – सौ. साधना पाटील.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी 
आज शिराळा येथील तरूण मित्र मंडळ वाचनालयास शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष सौ. साधना राजाराम पाटील यांनी सदिच्छा भेट दिली व वाचनालयाच्या कार्याची माहिती घेतली. त्यांचे स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष बाळकृष्ण हसबनीस यांनी केले. याप्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष दिनेश हसबनीस, कोषाध्यक्ष संतोष देशपांडे हेही उपस्थित होते. सौ. साधना पाटील यांनी वाचनालयातील विविध विभागांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. शिवाय वाचकांच्या प्रतिसादाची, स्पर्धा परीक्षा पुस्तकांची, विविध उपक्रमांची आवर्जून विचारपूस केली. ‘शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या या वाचनालयाचे कार्य अनुकरणीय आहे तसेच मंदिराबाहेरील रांगा वाचनालयाबाहेर दिसतील तेव्हा खऱ्याअर्थाने आदर्श समाज निर्माण होईल’ असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रचिती सांस्कृतिक मंचच्या संचालिका सौ. शैलजा प्रदीप काकडे यांनी ‘साने गुरुजी वाचनमाला’ सुरू करून बाल वाचकांसाठी श्यामची आई या पुस्तकाचे प्रकट वाचन करून बाल वाचकांना वाचनासाठी उद्युक्त करण्याची कल्पना मांडली तर ‘विविध स्पर्धां, उपक्रमात लोकांनीही स्वयंस्फूर्त योगदान दिले पाहिजे’ असे प्रतिपादन एच.पी. गॅस वितरक सौ. सुखदा सुमंत महाजन यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काॅग्रेस ,पक्षाच्या युवती कार्यकारणीच्या सौ. आशा आशिष साळुंखे, शिराळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सुनीता चंद्रकांत निकम, शिराळा सखीमंचच्या उपाध्यक्षा सौ. कल्पना जगदीश गायकवाड, स्वामी विवेकानंद टेक्निकल काॅलेजच्या प्राचार्या सौ. मीनाक्षी संदीप कदम, सौ. रेखा विनोद मुळीक, सौ. अश्विनी हणमंत पाटील. या सर्व उपस्थित होत्या. ‘भविष्यात वाचनालय अधिकधिक प्रगती करेल व समाजाने अशी आश्वासक साथ दिली तर वाचनालयाची पुढील कामे गतीने पूर्ण होतील’ अशी आशा वाचनालयाचे अध्यक्ष बाळकृष्ण हसबनीस यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रंथापाल प्रताप शिंदे यांनी केले. आभार सहा. ग्रंथपाल मकरंद अष्टेकर यांनी मानले. राजेश कुलकर्णी व आनंदराव जाधव यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!