ताज्या घडामोडी

श्रीसिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था कार्यालया समोर झेंडा वदन चा कार्यक्रम संपन्न.

Spread the love

भारत कवितके मुंबई.
मुंबई कांदिवली येथील श्रीसिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था, के.डी.कंपाउंड ,गांधी नगर,कांदिवली पश्चिम या संस्थेच्या कार्यालया समोर २६जानेवारी २०२२ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झेंडा वंदन चा कार्यक्रम संपन्न झाला.सालाबादप्रमाणे या वर्षीही प्रजासत्ताक दिना निमित्त संस्थेचे सचिव डी.आर.पाठक यांचे हस्ते झेंडा वंदनचा कार्यक्रम पार पडला.यावेळी संस्थेचे महासचिव, पत्रकार, कवी,लेखक,व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,

 

या भारत देशाला व्यासानी महाभारत ,वाल्मिकीनी रामायण ,दिले तर डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले,भारत देशासाठी या तीनही देणगी अमूल्य स्वरुपी आहेत.या वेळी संस्था अध्यक्ष विजय पाल, महासचिव भारत कवितके, सचिव डी.आर.पाठक,खजिनदार हिंदूराव मोरे,नन्हे लाल पाल, समरनाथ यादव,अशोक यादव,कमलेश कनोजिया,विरेंद्र यादव,श्रीकांत प्रजापति, राजेश गुप्ता,दिनेश जैसवाल,रामननरेश लोधी,मुकेश गुप्ता, प्रविण पाल, श्रीकृष्ण चौहाण,पिंटु वर्मा,शफातुल्ला खान,रामफेर यादव,जयराम वर्मा,आफताब अन्सारी,गुलाब मोर्या आ्णि संस्थेचे इतर पदाधिकारी, सभासद,सदस्य,आणि विभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!