ताज्या घडामोडी

जगातील चारही प्रगत रोबो प्रणाली आता पुण्यात एकाच रुग्णालयात उपलब्ध

देशातील सर्वात 'हायटेक' लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी लोकसेवेत रुजू

Spread the love

पुणे, (वार्ताहर) :  जगातील चारही अतिप्रगत रोबो प्रणालींची सुविधा उपलब्ध असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते   झाले. जागतिक स्तरावर शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात येणाऱ्या रोजा, कोरी, नॅव्हिओ व ब्रेनलॅप या चारही अत्याधुनिक रोबो प्रणाली उपलब्ध असलेले हे भारतातील एकमेव रुग्णालय असल्याने पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पुण्यातील सेनापती बापट रोडवरील गोखलेनगर येथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’ अर्थात ‘लोकमान्य एचएसएस’ या हायटेक रुग्णालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले.या रुग्णालयातील 104 बेडमुळे आता लोकमान्य रुग्णालयाची एकूण क्षमता 450 बेडची झाली आहे.

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत आयोजित केलेल्या या छोटेखानी समारंभास रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेंद्र वैद्य तसेच डॉ..सौ. मिताली वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी या चारही रोबो प्रणालींचे प्रात्यक्षिक श्री. पवार यांच्या समोर सादर करण्यात आले.

जागतिक दर्जाचे स्पेशल सर्जरी रुग्णालय सुरू करण्यासाठी लोकमान्य रुग्णालयाने घेतलेल्या पुढाकाराचे श्री. पवार यांनी विशेष कौतुक केले. लोकमान्यच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले, याचा विलक्षण आनंद होतोय. गुणवत्ता आणि सामाजिक जाणीव यामुळे लोकमान्य हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात देशात नावलौकिक मिळवला आहे. कोरोना सारख्या अवघड प्रसंगात लोकमान्य सारख्या संस्थालोकमान्य गुणवत्ता आणली तसेच सामाजिक भान ठेवले. त्यातून विस्तार होत गेला. वैद्यकीय क्षेत्रात पुणे हे महत्वाचे केंद्र बनले असून त्यात लोकमान्य रुग्णालयाचे योगदान मोठे आहे, असे पवार म्हणाले.

आजच्या प्रगत युगात या कुशल हातांना आणि कुशाग्र बुद्धीमत्तेला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड मिळाली की “हायटेक ह्युमन’ असा सुसंगम होतो, हेच लोकमान्य सुपर सर्जरी हॉस्पिटलमध्ये जवळून अनुभवता येते. महाराष्ट्राच्या विविध भागातील रुग्णांच्या सोयीसाठी मुंबई, कोकण, मराठवाडा, खान्देश, विदर्भ अशा विभागांमध्ये या रुग्णालयाच्या 22 बाह्य रुग्ण सेवा कक्ष कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर लोकमान्य हॉस्पिटल्सचा विस्तार आता भारताबाहेरही केनिया, इथिओपिया व ओमान या देशांमध्ये झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविल्याने लोकमान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जगभरातून रुग्ण येत असतात.

यंत्रमानव अर्थात रोबोच्या माध्यमातून सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे आधुनिक वैद्यकशास्त्राचे वरदान आहे. अमेरिकेच्या बाहेर हे तंत्रज्ञान लोकांसाठी उपलब्ध होणारे हे आशियाई खंडातले पहिले केंद्र असून आजमितीला  रोबोच्या सहाय्याने पाच हजारांहून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.

कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांच्या अस्थिरोगाबद्दलच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया इतकेच नाही तर, हृदयरोगावरील आव्हानात्मक शस्त्रक्रियांची सुविधा स्पेशल सर्जरी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्या आहेत. त्या बरोबरच डोळ्यांचे, हृदयाचे, मूत्रपिंडाचे, रक्तवाहिन्यांचे असे वेगवेगळ्या अवयवांच्यावर उपचार व स्पेशल सर्जरी येथे केल्या जातात. मागील दहा-वीस वर्षांपासून आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये अमूलाग्र बदल झाले. त्यातून यकृत, मूत्रपिंड याचे विकार वेगाने वाढले. या सर्वांवर एकाच ठिकाणी प्रभावी उपचार करता येतील, अशा प्रगत केंद्राची पुणेकरांच्या आरोग्यासाठी असलेली गरज ओळखून “एलएचएसएस’ची रचना केली आहे.

. जगातील असे अत्याधुनिक तंत्रज्ञान गरजू व सामान्य लोकांना लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी या द्वारे पुण्यात उपलब्ध करण्यात येत आहे, असे डॉ. नरेंद्र वैद्य यांनी सांगितले.

याप्रसंगी कोविडमध्ये निस्वार्थी सेवा देणा-या डाँ.श्रीकृष्ण जोशी,डाॅ.उमाकांत गलांडे, डाँ.पराग मोडक,डाँ.नागेश्वर राव,डाँ.स्नेहल देसाई,डाँ.जयंत श्रीखंडे यांचा सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!