आरोग्य व शिक्षण

टेक महिंद्रा कंपनीच्या वतीने दिव्यांगांना किराणा संचाचे वाटप

Spread the love

कामशेत: हिंजवडी येथील टेक महिंद्रा कंपनीच्या वतीने कामशेत येथील 250 दिव्यांगांना किराणा संचाचे व छत्रीचे वाटप करण्यात आले. इंद्रायणी अपंग संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.

कोरोना महामारीमुळे अनेक दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार गेल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक भान जपत कंपनीच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला. मागील वर्षीही कोरोना काळात कंपनीकडून दिव्यांगांना मदत करण्यात आली होती.

या कार्यक्रमावेळी टेक महिंद्रा कंपनीचे टीम लीडर कल्पना दिवाडकर, जलाल अलमेल, दीपक नायक दिव्यांग संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ सांगळे इंद्रायणी अपंग संस्थेचे अध्यक्ष सतीश ढमाले ,संपत ननवरे, विलास लगड आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!