आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

आगामी वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत गहुंजे स्टेडियमवर ५ सामने रंगणार.

पुणेकरांना यंदा जल्लोष करण्याची मिळणार संधी ..

Spread the love

आगामी वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत गहुंजे स्टेडियमवर ५ सामने रंगणार.In the upcoming World Cup 2023, 5 matches will be played at Gahunje Stadium.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २८ जुन.

पुणे शहरातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर विश्वचषक स्पर्धेतील ५ सामने होणार आहेत. २७ वर्षानंतर पुण्यात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे तब्बल पाच सामने होणार आहेत. पुण्यात विश्वचषक स्पर्धेतील या आधीचा शेवटचा सामना २० फेब्रुवारी १९९६ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध केनिया यांच्यात नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. त्यामुळे पुणेकरांना यंदा जल्लोष करण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे सांगितले. भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यांशिवाय इतर चार सामने पुण्यात होतील.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला आणि पर्यायाने पुण्याला विश्वचषक आयोजनाची संधी दिल्याबद्दल आम्ही बीसीसीआयचे सचिव जय शहा, बीसीसीआय यांचे आभार मानतो. अन्य राज्य संघटना देखील या सामान्यांच्या आयोजनासाठी प्रयत्न करत होत्या, परंतु बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आयोजन क्षमतेवर विश्वास दाखविला, असे रोहित पवार म्हणाले. तसेच पवार यांनी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, खजिनदार आशिष शेलार, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचेही आभार मानले.

आगामी वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत गाहुंजे स्टेडियमवर ५ सामने रंगणार आहेत. ज्यात भारत विरुद्ध बांग्लादेश, अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर २, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका,इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर १ आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश या सामन्यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!