आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन

तळेगाव लायन्स क्लब पदाधिकारी पदग्रहण समारंभ रविवार दिनांक २३ जुलै रोजी संपन्न.

वर्षभरात जवळजवळ साडेचारशे ॲक्टिव्हिटीज लायन सभासदांच्या सहकार्यातून आपण पूर्ण करू शकलो.लायन मयूर राजगुरव.

Spread the love

तळेगाव लायन्स क्लब पदाधिकारी पदग्रहण समारंभ रविवार दिनांक २३ जुलै रोजी संपन्न.Talegaon Lions Club office bearer inauguration ceremony concluded on Sunday 23rd July.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २५ जुलै.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर लायन प्रेसिडेंट {2022-23} लायन मयूर राजगुरव यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले.वर्षभरात जवळजवळ साडेचारशे ॲक्टिव्हिटीज लायन सभासदांच्या सहकार्यातून आपण पूर्ण करू शकलो त्याबद्दल कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

माजी प्रांतपाल डॉक्टर दीपक शहा यांचा परिचय लायन दिनेश कुलकर्णी यांनी अतिशय मोजक्या शब्दात करून दिला. लायन डॉक्टर दीपक भाईंनी जगातील २१० राष्ट्रातून ४६०००क्लबच्या माध्यमातून १५ लाख सभासद असलेल्या आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबची सभागृहास माहिती देऊन नवीन पाच सभासदांचा प्रवेश शपथविधी अतिशय प्रसन्न वातावरणात साकार झाला केला.

लायन शैलेशभाई शहा यांनी,इंदोरच्या माजी प्रांतपाल, इन्स्टॉलिंग ऑफिसर-लायन रश्मी गुप्ता यांचा अतिशय मोजक्या पण अर्थपूर्ण शब्दात सभागृहास परिचय करून दिला. गेल्या वर्षभरात अध्यक्ष मयूर राजगुरव सेक्रेटरी राजेंद्र झोरे, ट्रेझरर सचिन शहा यांनी अत्यंत मनापासून साडेचारशे ॲक्टिव्हिटीज यशस्वीपणे पार पडल्यात त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं रश्मी मॅडम यांनी भरभरून कौतुक केलं आणि मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.

देवाधिदेव शिवशंकर आणि बुद्धिदेवता श्रीगणेशचा आधार घेऊन पदग्रहण अधिकारी लायन. रश्मी मॅडम यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव देऊन अतिशय पवित्र वातावरणात शपथ दिली. नवनिर्वाचित लायन अध्यक्ष, डॉक्टर.अनिकेत काळोखे यांनी– आपण वर्षभर पंचसूत्री कार्यक्रम राबवणार आहोत त्यात- आदिवाशींसाठी वास्तू असतील- पाणी आडवा पाणी जीरवा संकल्प असेल- शैक्षणिक आणि आरोग्य संदर्भातील काही प्रकल्प असतील ते निश्चितच सिद्ध होतील कारण माझ्या मातापित्यांचे आशीर्वाद आणि संस्कार माझ्यावर आहेत या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे– पुत्र व्हावा ऐसा गुंडा- त्याचा तिन्ही लोकी झेंडा ! याच भावनेने ज्येष्ठ लायन सदस्य ला नंदकुमार काळोखे यांनी आपला पुत्र डॉक्टर अनिकेत यास आशीर्वाद दिलेत. यानंतर युवकांमध्ये गड किल्ल्याच्या माध्यमातून इतिहास जागवणारे प्राध्यापक प्रमोद बोराडे शैक्षणिक क्षेत्रात विशेष उपक्रम राबवणारे नितीन फाकटकर सर, सर्पमित्र आणि महापुरात बुडण्यापासून वाचवणाऱ्या  निलेश गराडे यांचा सपत्नीक सत्कार, एमपीएससी परीक्षेत मावळातून घवघवीत यश मिळवणाऱ्या श्रुती संजय मालपोटे, बारावीत 97% मार्क्स मिळवणाऱ्या चि श्रिया अमित पोतदार या सर्वांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

ज्येष्ठ लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी लायन परिवारांच्या वतीने- इन्स्टॉलिंग ऑफिसर रश्मी गुप्ता यांनी आम्हाला संपत्ती पेक्षाही संस्कारने खऱ्या अर्थाने श्रीमंत म्हणजे रिच आज केले आहे, त्याबद्दल रश्मी मॅडमचे मनःपूर्वक आभार मानले. नूतन अध्यक्ष अनिकेत यास- तुझ्या माता पित्यांनी आणि लायन्स क्लबने तुझ्या पंखात प्रचंड शक्ती तुला प्रदान केलेली आहे की त्यायोगे तू तुझे सर्व संकल्प पूर्णत्वास नेऊ शकशील यात आम्हाला यात किंचितही शंका नाही- या शब्दात डॉक्टरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सभागृहाची प्रसन्न करणारी सजावट- सर्व पाहुण्यांचे यथोचित स्वागत! समारंभाच्या वेळेचे नियोजन या सर्वांसाठी अहोरात्र कष्ट घेणारे या सोहळ्याचे चेअरमन- ला दीपक बाळसराफ व त्यांना साथ देणाऱ्या ला नंदकुमार काळोखे- ला प्रकाश पटेल या सर्वांचं क्लबच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुकही डॉक्टरांनी केलं. समारंभाचे चेअरमन ला दीपक बाळसराफ यांनी सर्वप्रथम क्लबने त्यांच्यावर या समारंभासाठी जो विश्वास टाकला त्याबद्दल प्रथम त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

जवळजवळ अडीच तास पाहुण्यांना जागेवरच खीळवून ठेवणारे सूत्रसंचालन ला राधेश्याम भंडारी आणि ला प्रमिला वाळुंज यांनी केले. सेक्रेटरी लायन सुचित्रा चौधरीच्या अनाउन्समेंट नंतर  समारंभाची सांगता झाली. सभागृहातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील विलक्षण आनंद आणि समाधान हीच या समारंभाच्या यशस्वीतेची पावती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!