मावळराजकीय

साते मोहितेवाडी काँग्रेस आय कमिटीच्या अध्यक्षपदी अंतोष मालपोटे यांची निवड.

Spread the love

साते मोहितेवाडी काँग्रेस आय कमिटीच्या अध्यक्षपदी अंतोष मालपोटे यांची निवड.Anthosh Malpote elected as President of Sate Mohitewadi Congress I Committee.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २५ जुलै.

साते मोहितेवाडी काँग्रेस आय कमिटीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे सदस्य अंतोष मालपोटे यांची निवड करण्यात आल्याचे पत्र मावळ तालुका काँग्रेस आय कमिटी चे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी दिले आहे.

वडगाव मावळ येथे पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये अंतोष मालपोटे यांची निवड जाहीर करण्यात आली. मालपोटे यांनी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. साते व मोहिते वाडी परिसरामध्ये काँग्रेस पक्षाची बांधणी करून पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे अंतोष मालपोटे यांनी नमूद केले आहे.

या प्रसंगी मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, प्रांतिक सदस्य दिलीप ढमाले, मावळ महिला अध्यक्ष प्रतिमा हिरे, मावळ युवक अध्यक्ष राजेश वाघोले, मावळ लीगल सेलचे अध्यक्ष ,ॲड खंडू तीकोणे, तालुका प्रवक्ता मिलिंद अच्युत, तळेगाव युवक अध्यक्ष समीर दाभाडे, विशाल वाळूंज.तळेगाव कार्याध्यक्ष योगेश पारगे, युवक कार्याध्यक्ष ॲड. राम शहाणे, आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!