आरोग्य व शिक्षण

प्रजासत्ताक दिनी जनसेवा विकास समितीच्या वतीने मिठाई वाटप

Spread the love

तळेगाव : प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी 2022 रोजी जनसेवा विकास समितीच्या वतीने तळेगाव स्टेशन भागात विविध ठिकाणी मिठाई वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी दिली आहे.

भारतात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमंलात आली. म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
गेल्या दोन वर्षांनपासून जगाला कोव्हिडं च्या साथीने विळखा घातला होता.

करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपण आपल्या जवळचे अनेकजण दगवल्याचे पाहिले होते.गेली दोन वर्षे संपूर्ण जग लॉकडाऊन मुळे हतबल झाले होते. गेली दोन वर्षे कोव्हिडं काळात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे व त्यांचे कार्यकर्ते सर्वस्व पणाला लावून समाजसेवा व रुग्णसेवा करीत होते.

” ह्या जगावरील करोना चे संकट लवकरात लवकर हटावे व जगामध्ये मानवी चैतन्य पुन्हा बहरून यावे या साठी जनसेवा विकास समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी मिठाई वाटप करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी नमूद केले.

२६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजल्या पासून मिठाई चे वाटप जनसेवा विकास समिती खालील ठिकाणी करणार आहे.

१) तळेगाव स्टेशन चौक
(ओसीया मेडिकल समोर)
२)विरचक्र मंडळ चौक , यशवंत नगर.
३) मराठा क्रांती चौक , सिंडिकेट बँक
४) जनसेवा वाचनालय , इंद्रायणी महाविद्यालया समोर
५)मनोहर नगर, बालाजी मार्बल समोर

मिठाई हे केवळ निमित्त असून कोव्हिडं रुपी भस्मासुरचा वध व्हावा व पुन्हा जन जीवन सुरळीत व्हावे यासाठी केलेली प्रार्थना असून सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!