ताज्या घडामोडी

कामेरीतील  साहित्य संमेलन नव्या वाडःमय युगाची नांदी आहे- ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन

Spread the love

कामेरीतील  साहित्य संमेलन नव्या वाडमय युगाची नांदी आहे असे विचार ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन यांनी मांडले ते कामेरी तालुका वाळवा येथे कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णू जी पाटील सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या मातृ स्मृति ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.

यावेळी श्री बी एस पाटील डॉ विजय चोरमारे प्रा संजीवनी तडेगावकर श्रीमती वासंती मेरु प्रा सुनिता बोरडे खडसे यांच्या ग्रंथांना उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा राज्यस्तरीय हौसाई स्मृति साहित्य पुरस्कार देऊन प्रांताधिकारी गणेश मरकड यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी श्री महाजन पुढे म्हणाले नव्या युगातील येणारे बदल टिपणारी साहित्य निर्मिती झाली पाहिजे ताराबाई शिंदे लक्ष्मीबाई टिळक आणि बेबी कांबळे या महिलांनी स्त्री लेखनाच्या वाटा मोकळ्या केल्या समृद्धी देणारे व समाज्याची मानसिक उन्नती करणारे साहित्य काळजातून कागदावर उतरत असते.

यावेळी संमेलनाचे उद् घाटक प्रा डॉ बाळासाहेब लबडे आपल्या भाषणात म्हणाले ग्रामीण साहित्याने कात टाकून नव्या उत्तर आधुनिक साहित्याची निर्मिती करावी साहित्य हे समाज परिवर्तनाचे साधन आहे पारंपारिक साहित्यापेक्षा वेगळ्या शैलीची कथा कविता कादंबरी समीक्षा निर्माण करून लेखकांनी उत्तर आधुनिक ग्रामीण साहित्याची वेगळी ओळख निर्माण करावी अलीकडच्या नव्या पिढीतील लेखकांनी यादृष्टीने साहित्य समृद्ध केले आहे ही गौरवास्पद बाब आहे यावेळी श्री गणेश मरकड संजय बोरुडे शाहिद के र ट कर संजय ठिगळे अजिंक्य कुंभार बी एस पाटील विजय चोरमारे संजीवनी तडेगावकर यांचीही भाषणे झाली संमेलनासाठी महाराष्ट्र मराठी मंडळ नैरोबी केनिया चे अध्यक्ष राजकुमार पाटील श्री भीमराव धुळूबुळू विजय कदम तानाजी जाधव आनंदराव पाटील काका शामराव पाटील आण्णा संजीव पाटील अरुणादेवी पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात परिसंवादात प्रा डॉ अनिल पाटील प्रा श्रीकांत पाटील व नामदेव भोसले यांनी मराठी साहित्यातील आई या विषयावर आपले विचार मांडले तिसऱ्या सत्रात दयासागर बने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात अनेक कवींनी आपला सहभाग नोंदवला व दमदार कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली या समारंभासाठी आर के जाधव एमके जाधव पी के पाटील ए आर पाटील एस के पाटील विलास रकटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक दि बा पाटील यांनी केले आभार प्रा दीपक स्वामी यांनी मानले सूत्रसंचालन पो प ट कुंभार व भारती पाटील यांनी केले या संमेलनाचे नियोजन अशोक नीळकंठ रमेश खंडागळे धनाजी दाभोळे धनाजी घोरपडे संजय पाटील ,रविंद्र पाटील,भास्कर पाटील,उमेश जाधव यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!