आरोग्य व शिक्षण

सोनू अनाजी वाळंज विद्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

Spread the love

आंबवणे : येथील कोराईगड शिक्षण संस्थेच्या सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सावित्री ते जिजाऊ सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा या शासन उपक्रम अंतर्गत आंबवणे परिसरातील महिला डॉक्टर,सुपरव्हायझर,सिस्टर, अंगणवाडी सेविका तथा मदतनीस यांनी कोविड 19 च्या संघर्षाच्या काळात राष्ट्रीय कार्य म्हणून वेळोवेळी सहभाग घेतला. आणि कठीण परिस्थितीत धैर्याने ही परिस्थितीती सावरण्यासाठी योगदान दिले.अश्या महिलांना जिजाऊच्या जयंती निमित्ताने “कोरोना योद्धा सन्मान स्त्रियांचा ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी मा श्री. नंदकुमार वाळंज संस्था अध्यक्ष,  वत्सलाताई वाळंज मा. आदर्श सरपंच संगीता नेवासकर ,उपसरपंच दत्तात्रय गोरे , सर केंद्र प्रमुख पाहुणे लाभले.

नंदकुमार वाळंज आपल्याला मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले कि, सावित्रीबाई, जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य उभारण्याचे स्वप्न उरी बाळगणे म्हणजे सोपी गोष्ट नाही.

छाया परीट आरोग्य सेविका आपल्या पुरस्काला उत्तर देताना म्हणाल्या कि, मी आंबवणे प्राथमिक आरोग्य केंद्रात असताना खूप मोठया संख्येने लसीकरण पार पाडले.माझी बदली झाली असून माझ्या केलेल्या कामाची दखल कोराईगड संस्थेने घेतली त्याबद्दल माझ्या वतीने व सर्व पुरस्कारार्थी च्या वतीने आदरणीय बाबूजी, सौ वत्सलाताई वाळंज आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक देवरे सर यांचे मनापासून आभार मानते.

याप्रसंगी डॉ. पवार मॅडम (वैद्यकीय अधिकारी आंबवणे.),डॉ. मृणाली पटवर्धन (वैद्यकीय अधिकारी आंबवणे),मंगला साळुंखे (आरोग्य सेविका, कामशेत), छाया परीट(आरोग्य सेविका)पूर्वा दळवी (आशा सुपरव्हायझर),आशा राम मोढवे (आशा वर्कर),आशा अनंता कराळे (आशा वर्कर),स्वाती दाभाडे (आशा वर्कर), कोमल फाटक(आशा वर्कर)जोत्स्ना संजय कुलथे (अंगणवाडी कार्यकर्ती),यमुना दिपक वाळंज (अंगणवाडी कार्यकर्ती), अलका हुंडारे(अंगणवाडी कार्यकर्ती), निमा फाटक(अंगणवाडी कार्यकर्ती), मंदा वाळंज (अंगणवाडी मदतनीस),सुजाता वाळंज (अंगणवाडी मदतनीस).या एकूण पंधरा महिलांचा “कोरोना योद्धा सन्मान स्त्रियांचा ‘ या पुरस्काराने मान्यवर पाहुण्यांच्या शूभ हस्ते शाल श्रीफळ, गुलाब पुष्प, आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केले.

या प्रसंगी गणेश दळवी पोलीस पाटील,
नारायण दळवी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हायस्कुल,उल्हासशेठ मानकर सा. कार्यकर्ते,
विनायक तोंडे अध्यक्ष शा. व्यवस्थापन समिती जि. प. शाळा आंबवणे,रुपेश दळवी युवा नेते,पिचारे सर मुख्याध्यापक जि. प शाळा भांबर्डे,सूर्यवंशी सर माजगाव हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीस विद्यार्थ्यानी भाषण व एकपात्री प्रयोग सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक  देवरे बी. जी. यांनी व्यक्त केले.
कुलथे एस. एस. यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी रविंद्र सोनवणे, बाळासाहेब खेडकर, विजय दळवी, शालिनी देवरे, संतोष दळवी, महादेव खेडकर यांनी मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!