ताज्या घडामोडी

आटपाडी गावातील जिल्हा परिषद शाळा नंबर १ “माझी शाळा-आदर्श शाळा” बनवणे कामाचा शुभारंभ संपन्न.

Spread the love

प्रतिनिधी;सौ.मंजुषा पवार.

जि प शाळा नंबर 1 ही शाळा परिसरातील माॅडेल स्कूल बनवणे कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. तानाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते व आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
माझी शाळा – आदर्श शाळा उपक्रमांतर्गत शाळेतील फरशी, दारे खिडक्या, ग्रील अध्यावत करणे तसेच रंगरंगोटी करून शाळा अद्यावत करण्यात येणार आहे जेणेकरून पंचक्रोशीतील पालकांनी त्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेण्यास भाग पाडुन मुलांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास घडवून आणावा हा या मागचा उद्देश आहे.
या कार्यक्रम प्रसंगी गट विकास अधिकारी श्री. मनोज भोसले, उप अभियंता श्री. देवांग साहेब, माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. डि.बी. मोरे साहेब, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडवोकेट श्री. धनंजय पाटील, युवा नेते श्री. दत्तात्रय पाटील पंच, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. डी. एम. पाटील सर, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रकाश मरगळे व श्री. बाळासाहेब मेटकरी, श्री. अरविंद चव्हाण, शिवसेना नेते श्री. सुभाष जगताप, पत्रकार श्री. प्रशांत भंडारे, श्री. सुरज मुल्ला, केंद्रप्रमुख मैनाताई गायकवाड, मुख्याध्यापक श्री. विजय राजमाने सर, श्री. शिवाजी लेंगरे सर, श्रीमती योगिता शिंदे मॅडम, श्री. काकासो पाटील सर, श्रीमती आयोध्या भटके मॅडम, श्री. राजेंद्र कांबळे सर, सौ. स्मिता पाटील मॅडम यांच्यासह श्री. आसिफ खाटीक, युवासेना अध्यक्ष श्री. संतोष पुजारी, इंजिनीयर श्री. राजेश नांगरे, श्री.किशोर जाधव, इंजिनिअर श्री. महेश पाटील, श्री. पिनू माळी पंच, श्री. दौलतराव चव्हाण पाटील, ग्रामसेवक श्री.महादेव इंगवले, श्री. अभिजित देशमुख, श्री.सुनिल मेटकरी. अभिजीत आयवळे, श्री. सचिन सपाटे, श्री मनोज देशपांडे, श्री मजहर तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेमध्ये सर्वांचे स्वागत सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री. तानाजीराव पाटील यांनी शाळेच्या बाबतीत सर्व ते सहकार्य व निधी मिळवून देण्याची ग्वाही दिली, ही शाळा जिल्ह्यात आदर्श होण्यासाठी लोकसहभाग मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे सांगितले व शाळेला सर्व प्रकारे प्रगतीत नेण्या कामी सर्व अधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याची सूचनाही केली. स्वागत व प्रास्ताविक व विविध कामाचा आढावा श्री.शिवाजीराव लेंगरे सर यांनी सर्वांसमोर मांडला. शेवटी आभार श्री. काकासाहेब पाटील सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!