ताज्या घडामोडी

शिराळा तालुक्यातील 15 ते 18 वयोगटातील लसीकरण 99 टक्के

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा तालुक्यात 15 ते 18 वयोगटातील ९९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे एकूण 51 शाळा असून 6208 लाभार्थी नोंद आहेतआजअखेर 6139 लाभार्थी व 99 टक्के कामआज अखेर पूर्ण झाले आहे उर्वरित काम या आठवड्यात पूर्ण होईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण पाटील यांनी दिली
शिराळा तालुक्यात 1 जानेवारी 2022 पासून एकूण 15 इतके पॉसीटिव्ह रुग्ण आढळून आले असून सर्व रुग्ण यांना वैद्यकीय उपचार केले असून सगळे रुग्ण घरी उपचार घेत आहेत
6 जानेवारी रोजी एकाच दिवशी 11 रुग्ण पॉसीटिव्ह आले आहेत तेही सर्व घरी उपचार घेत आहेत
सर्व आरोग्य यंत्रणा तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने योग्य निदान व उपचार करत आहेत
शिराळा तालुक्यातील कोरोना लसीकरण पहिला डोस 98 टक्के तर दुसरा डोस 80 टक्के झाला असुन नागरिकांना मास्क सॅनिटीझर व सामाजीक अंतर ठवण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी शिराळा डॉ प्रविण पाटील यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!