ताज्या घडामोडी

शेडगेवाडी येथे आ.मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते कॅलेंडर प्रकाशन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील रंगराव शेडगे यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मुद्रित केलेल्या कॅलेंडरचा प्रकाशन समारंभ पार पडला. आमदार मानसिंगराव नाईक यांच्याच हस्ते आज चिखली (ता. शिराळा) येथे मुद्रित केलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रंगराव शेडगे, तालुक्याचे उपसभापती बी. के. नायकवडी, तानाजी वनारे, बाजार समितीचे संचालक दिनकर दिंडे, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष ॲड. महेश शेडगे, उपसरपंच महादेव शेडगे, नाठवडेचे सरपंच बाजीराव मोहिते, आबासो, किरण, बाजीराव शेडगे, आनंदा मोहिते, नितीन कांबळे, बकस, रशीद व जकरीया मुजावर, बंडा कोठावळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!