आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी ओळखपत्र आवश्यक

Spread the love

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये 18 वर्षाखालील मुली व मुलांना माॅलमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा शाळा व महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे अनिवार्य असणार आहे.

कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने सुधारणा केली आहे. राज्यामध्ये 18 वर्षाखालील मुला-मुलींचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे माॅलमध्ये प्रवेश देताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड,पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असणारे शाळा व महाविद्यालयाचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल असे आदेशात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!