ताज्या घडामोडी

धनगर -वास्तव नि वास्तविकता

Spread the love

स्वराज्य संकल्पक व मराठेशाहीचे संस्थापक-प्रेरणास्थान श्री श्री शहाजी राजे भोसले (थोरले सरकार).
थोरल्या सरकारांच्या डोळ्यातील स्वराज्याविषयीचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी स्वतःच्या पोटी धगधगत्या इतिहासास जन्म देणाऱ्या आऊ जिजाऊ….
आई-वडिलांचे स्वप्न शिरसावंद्य मानुन स्वराज्य उभारणी साठी अखंड अविरत घौडदौड करणारे,राजा व राज्य कैसे असावे याचे ज्वलंत नि जिवंत उदाहरण असणारे छञपती श्री शिवाजी महाराज…
*_स्वतःच्या जन्मदात्याने शिरावर पेललेले स्वराज्य धनुष्य स्वतःच्या खांद्यावर पेलताना गनिमांवर केवळ नजरेनेच जरब बसविणारे छञपती शंभुराजे….._*
*_स्वराज्य म्हणजे धगधगता निखारा आणि या निखाऱ्यावर चालताना स्वतःच्या परीक्रमाची शर्थ करणारे,गनिमाची पळता भुई थोडी करणारे थोरले सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर…._*
*_स्वराज्याचे सुराज्य व्हावे यासाठी निरंतर अहोराञ झटणाऱ्या,एका हातात शस्ञ व एका हातात शास्ञ घेऊन न्यायासनास वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आई अहिल्या…._*
*_इंग्रजांना एक दोन वेळा नव्हे तर तब्बल १७ वेळा स्वतःच्या तलवारीने पाणी पाजणारे,मराठी रियासतीचे शेवटचे असामान्य यौद्धे महाराजा यशवंतराव होळकर…._*
*_मराठी साम्राज्याच्या जडणघडणीसाठी ज्यांनी ज्यांनी खारीचा वाटा उचलला अश्या यौद्ध्यांस विनम्र अभिवादन….!_*

*आजच्या लेखात मी आपणांस धनगर समाजाच्या उत्पती पासुन ते सध्याच्या राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक विषयांवर भाष्य करणार आहे.*

*_धनगर समाज खरेतर तब्बल ५००० हजार वर्षापूर्वीपासुन या भारत भुमीवर वास्तव्य करीत आलेली प्राचीन जमात आहे.या जमातीच्या जडणघडणीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण नावीण्य आढळुन आले आहे.ही जमात गुरे-ढुरे व मेंढपाळ करुन स्वतःचे अस्तित्व व अस्मिता जपत आलेली आहे.स्वतःच्या विशिष्ट जीवनशैलीने व राहणिमानाने तसेच अनोख्या संस्कृतीने कायम इतरांना भुरळ पाडत आलेली ही जमात आहे. याचेच पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतिहास संशोधकांच्या लेखनीतुन प्रखरतेने जाणवले.डॉ.गुंथर सोंन्थायमर नावाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधनकार यांनी देखील धनगर समाजाच्या संस्कृती व लोकगीतांवर सखोल अभ्यास केला.समाजासंदर्भातील अनेक अचंबीत करणारे सिद्धांत त्यांनी मांडले._*
*_सुमारे पाच हजार वर्षापूर्वी आर्य लोक भारतात आले आर्य समाज हा उत्तर ध्रुवाकडुन दक्षिण ध्रुवाकडे स्थलांतरीत झाला माञ असे असले तरी या आर्य लोकांचे वंशजच वा मुळ गर्भच हा धनगर जमातीचा आहे.पुढे याच आर्यांनी वेद रचले व वैदिक धर्माची स्थापना केली.पुर्वीच्या काळी धनगर समाज विद्वान होता त्यांनी कैक उपनिषेधही लिहिली होती.त्या कालखंडातील बरेच रुषीमुनी हे धनगर जमातीत जन्मास आले. याचाच अर्थ धनगर जमात ही भारतातील अत्यंत प्राचीन वन्य जमात असुन अन्य कोणतीही जमात त्याकाळी अस्तित्वात नव्हती हे स्पष्टच होते._*
*_मुळात ब्राम्हण,रजपुत,मराठा व धनगर समाजाचे गोञ,कुळी,वंश व प्रवर हे समान असुन हे सर्व समाज आर्य वंशातील आहेत.तसेच मराठा व धनगर यांच्यातील बरीचशी आडनावे एकच आहेत.भारतात क्षञीय वंशाच्या तीन प्रमुख जाती आढळतात त्यात रजपुत,मराठा व धनगर यांचा सामावेश असुन मुळात या तिन्ही जाती एकच आहेत.कालांतराने या मुळ जाती अनेक पोटजातीत विभागला गेला.पुढे धनगर समाजही अनेक पोटजातीत विभागला.मुळचा धनगर समाज एकच आहे._*
*_प्राचीन काळात धनगरांचे साम्राज्य सबंध भारतभर विस्तारले होते. कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशात यादव तसेच मद्रास भारतातील पहिल्या कुळातील जमीनदार धनगर समाजातून होते कर्नाटकातील विजयनगर चे राजे तसेच त्रावणकोर कोचीन व पडकोट येथील पल्लव राजे व त्यांचे सरदार हे धनगर होते मालखंड,वरंगळ,म्हैसूर,कलेदी,बिदन,इक्करचे पाळघर म्हणजेच राजे जिंजी म्हणजेच कृष्णगिरीचे राजे हे धनगर होते. कर्नाटकातील बहुतेक सर्व राजे पाळेगार सरदार देसाई पाटील व इतर वतनदार धनगर जमातीतील होते पदु कोटाचे पल्लव राजांचे धार्मिक विधी करणारे लोक धनगर जातीचे होते.धनगर समाजाने या प्राचीन इतिहासाशी स्वतःची नाळ जोडून धनगरांचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडवा. हा प्राचीन इतिहास अभ्यासून धनगर समाजाने जागृत व्हावे._*
*_जसजशी इतिहासाची पाने पुढे सरकली तसतशी या महाराष्ट्रात न भुतो न भविष्यती अश्या इतिहासाचा पाया रचला जावु लागला.छञपती शिवरायांनी स्वराज्याचा घाट बांधण्याचा निर्धार केला याचा पाया होते ते अठरा पगड जाती व बारा बलुतेदार. छञपतींनी ज्या काळी मराठा साम्राज्याची स्थापना करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या सैन्यात प्रामुख्याने धनगर मुख्य प्रमाणात होते. स्वतंत्र मराठी साम्राज्य स्थापन करण्यास मराठे व धनगरांचा मुख्यत्वे हातभार लागला. महाराणी ताराराणी सरकार यांनी औरंगजेबाशी जो लढा उभारला त्यामध्ये मुख्यत्वे मराठी तसेच धनगरांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराणी ताराराणी सरकार यांचे साम्राज्य उभारण्यास सिंहाचा वाटा उचलला दस्तरखुद्द इतिहासाने देखील याची नोंद घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी प्रामुख्‍याने धनगर सरदार निंबाजी पाटोळा,काकडे,खांडेकर,शिंगाडा,येसाजी थोरात,शेळके,देवकाते,पांढरे आधी धनगर कुटुंबे सेवेठायी तत्पर होती.छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यास खांदा देऊन त्यांनी अनेक रण मैदाने गाजवली. कैक गनिमास कंठस्नान घालून स्वराज्याची पताका स्वतःच्या खांद्यावर लीलया पेलली प्रसंगी जीवाची बाजी ही लावली,इतिहासाच्या पानावरती धनगर समाजाच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी स्वतःच्या तलवारीचे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्या स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रामुख्याने पांढरी देवकाते बंडगर शेंडगे चोपडे कोळेकर काळे कोकणे वाघमोडे कोकरे साहेब पुढे शिंदे हजारे मदने करात शेळके सलगर पाटोळे खताळ माननीय फणसे शिंगाडे डांगे काकडे गाढवे रुपनवर होळकर देसाई देशमुख इनामदार काशीद धनगर घराण्यांनी इतिहासाच्या पानापानावर स्वतःच्या शौर्याची पताका गगनाला ही भिडवली. या मातीच्या तख्ताच्या रक्षणासाठी काही धनगर सरदार धारातीर्थी पडले स्वतःच्या रक्ताच्या थेंबांनी येथल्या मातीस अभिषेक घातला._*
*_छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्युपश्चात औरंगजेब बादशहाने स्वतःचा रोख लाखो मावळ्यांच्या रक्ताने न्हाऊन निघालेल्या महाराष्ट्राच्या मातीकडे वळवला.त्यावेळी छत्रपती संभाजीराजांना गद्दारां करवे अटक करून.अतोनात हाल करून देहदंड देण्यात आला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर धाकले धनी राजाराम महाराज यांनी स्वराज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर पेलली. औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीतील एक एक कण मिळवण्यासाठी झुंजत राहिला त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी धनगर समाजातील बंडगर :-अमीर उल् उमराव, पांढरे :- शरबत मुलुक,काकडे:- दिनकरराव,महानवर:- बहादुर फते जंग, ढोके,ढमढेरे,विठुजी सलगर अशा सरदारांना विविध पदव्या देऊन त्यांचा सन्मान केला._*
*_इसवी सन 1761 च्या पानिपतच्या महासंग्रामात सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर,रामराव खंडोजी,देवकाते, मानाजी धायगुडे, मलकोजी माने, यमाजी कोकणे, रंगराव शिंगाडे, विठ्ठल राव पांढरे,गंगाजी शिंगाडे, यमाजी टकले,नारायणराव पांढरे,केरबा काळे,तुकोची गाढवे,नरसिंगराव चोपडे,आनंदराव माने,शिवाजी शेळके,धावजी माने अशा धनगर सरदारांनी पराक्रमाची शर्थ केली._*
*_इसवी सन 1758 साली श्रीमंत सुभेदर मल्हार राव होळकर यांच्या नेतृत्वाखाली पहिले तुकोजीराव होळकर यांनी प्रथमच अटकेपार भगवा झेंडा फडकला._*
*_इंदूर चे पहिले तुकोजीराव होळकर यांचा चौथा मुलगा यशवंतराव यांनी इ.सं 1804 मध्ये कर्नल मोन्सन याचा पराभव करून इंग्रजी सैन्याची फार नासाडी केली. अजिंक्य समजल्या गेलेल्या इंग्रज सैन्याला यशवंतरावांनी दिलेल्या मार पाहिल्यावर आपल्याला नेपोलियन बोनापार्ट ची आठवण होते नेपोलियन व यशवंतराव समकालीन होते व दोघांचा शत्रू एकच होता असे रियासतकार सरदेसाई यांनी म्हटले आहे.यशवंतराव अंतःकरणाचे उदार गरीबांचे कनवाळु हाताखालच्या लोकांना जीवापाड जपणारे, स्वतःच्या सुखा विषयी अत्यंत बेफिकीर पण रणांगणी कर्दनकाळ ,त्यांच्या तोडीचा सेनानायक मराठ्यांकडे दुसरा कोणीच नव्हता. एवढा दैदिप्यमान इतिहास धनगरांच्या पाठीशी असताना धनगर मात्र या इतिहासापासून कायम वंचितच राहिला पुढे या इतिहासाचा इतका विसर पडला की धनगर समाज स्वतःचे राजकीय अस्तित्वच गमावून बसला.एकविसाव्या शतकात धनगर समाज केवळ पुण्यश्लोक अहिल्याआईंच्या जयंती पुरताच मर्यादित राहिला की काय हा प्रश्न आता पडला आहे. सज्ञान असून आम्हाला अज्ञाना सारखे आरक्षणा भोवती गुरफाटुन राजकीय लोक स्वतःची पोळी भाजून घेत आहे तरीही धनगर समाजास अजून जाग कशी येत नाही. धनगर समाजाने स्वतःच्या इतिहासाचा विसर न पाडता अजूनही मातीतून धूळ उडवीत स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करावे एवढी धमक या समाजाच्या मनगटामध्ये आजही नक्कीच आहे._*
*_जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो रसातळाला जातो हाही एक इतिहासच आहे.त्यामुळेच मी म्हणतो उठ धनगरा जागा हो आरक्षणा सोबत राजकीय अस्तित्वाचा धागा हो. ज्या दिवशी राजकारणात आपले पाय घट्ट रोवले जातील त्या वेळेसच आपला आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. सबंध धनगर समाजाने एक शपथ घेऊनी आपल्या ज्वलंत नी जिवंत इतिहासाचा बेल भंडारा शिरावर घेऊन दिल्लीचे तख्त फोडण्याची धमक ह्या धनगरांत आहे हे दाखवून द्यावे. आपल्या इतिहासाचा जागर मनात ठेवून धनगर समाजाने राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये स्वतःचे वेगळेपण दाखवून पुनश्च इतिहासाला साद घालावी.
*_देशाच्या वाटचालीमध्ये संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व असून देशाच्या कानाकोपऱ्यांत विखुरलेल्या धनगर समाजाच्या चाली-रूढी-परंपरा व संस्कृती अमुल्य आहे. या पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हावे, समाजातील भावी पिढीला पारंपरिक संस्कृतीची माहिती व्हावी,ही अमुल्य-अतुल्य देण वारसा आपण जपला पाहीजे.यामध्ये प्रामुख्याने धनगरी ओव्या, गजी नृत्य, पटका संवर्धन, पारंपारिक वेशभूषा व धनगर समाजाच्या जुन्या चाली, रिती, रूढी,परंपरा नव्या पिढीला आत्मसात करण्याची संधी काही जुन्या जाणत्या मंडळींकडुन,अभ्यासकांकडुन नव्या रक्ताच्या तरुण मंडळींना उपलब्ध करुन द्यावी.पुरातन काळापासून धनगर समाज हा देशातील दऱ्याखोऱ्यामध्ये राहून शेळ्या मेंढ्या पाळून आपली उपजीविका करतो. आपल्या पारंपरिक संस्कृतीचा संवर्धन काही समाज बांधव करत असले तरी आधुनिक काळाच्या ओघात अनेक लोककला, संस्कृती लोप पावत चालल्या आहेत. यामध्ये धनगर समाजाच्या संस्कृतीचा देखील समावेश आहे.त्या संस्कृतींना पुन्हा नव्याची पालवी फुटावी, ती बहरावी यासाठी आपण सारे एकञ यावे._*
*_इतिहास घडविणारी माणसं इतिहास विसरु शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवु शकत नाही हे भयाण वास्तव आता कोठे आपण बदलायला हवे.काळानुरुप आपल्यात बदल घडला पाहिजे,विचारांमध्ये आचरण यायला हवे तसेच धगधगत्या अग्निकुंडात हात घालुन इतिहासाला गवसणी घातलीच पाहिजे हे ही अनिवार्य आहे.ज्वलंत धनगर साम्राज्याचे पेव पुन्हा जोमाने जिवंत झालेच पाहिजे.आकार-ऊकारांनी हुंकार भरलेल्या कैक जीवांच्या आहुत्यांनी महाराष्ट्राच्या मातीला स्नान घातले अशा नरवीरांच्या मांदीयाळीत आपला जन्म झाला हे आपले परम भाग्य….!_*
*_पुन्हा भेटु असे कैक ज्वलंत विषय घेऊन,गर्दना टाकुन दिलेल्या धनगर साम्राजाच्या इतिहासाला जिवंत करु….!_*

*जय मल्हार ! जय अहिल्या !! जय यशवंत !!!*

*आपला,*
*श्री.दिपक रमेश होळकर.*
*7738692103.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!