ताज्या घडामोडी

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात “गुन्हा नोंद’तर्फे पत्रकारांना मिठाई वाटप

Spread the love

मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी पाक्षिक” गुन्हे नोंद ‘ आणि ” वार्ताहर टाइम्स ‘ तर्फे या उपस्थित सर्व पत्रकार मंडळींना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.सुरेश माने यांच्या उपस्थितीत मिठाईचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाहक विष्णू सोनवणे, दैनिक नवाकाळ चे उपसंपादक शंकर कडव, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र भोजने,” गुन्हा नोंद ‘ कार्यकारी संपादक संतोष भालेराव आणि वार्ताहर टाइम्सचे रवी वाघमारे, पीपल्स मुमेंट चे संजय पवार, झुंजार सातारचे संपादक दत्तात्रय कोळेकर, दैनिक नवशक्तीचे क्राईम रिपोर्टर शिरीष वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!