महाराष्ट्र

तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीकोनातून देहूमध्ये विकासात्मक कामे करण्यासाठी सहकार्य करणार – खासदार सुप्रिया सुळे

Spread the love

देहू : संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे  यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरातील पुरातन मंदिर, वास्तु, सांप्रदायिक परंपरा यांची सुप्रिया सुळे यांनी माहिती घेतली.यावेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांचा सन्मान केला. पालखी तळ, वारकऱ्यांसाठी मुलभुत सेवासुविधा, पालखी प्रवासात येणाऱ्या अडचणी अशा विविध समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. तद्नंतर इंद्रायणी नदीवरील घाटाची देखील पाहणी केली. तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीकोनातून विकासात्मक कामे करण्यासाठी सहकार्य करण्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

यावेळी आमदार सुनिल आण्णा शेळके,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे, विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे, ह.भ.प.संजय महाराज मोरे, ह.भ.प.विशाल महाराज मोरे, श्री.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश हगवणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!