आरोग्य व शिक्षण

नम्रता क्रशर कंपनीच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

Spread the love

तळेगाव : येथील नम्रता क्रशर कंपनीच्या प्रांगणात देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) उत्साहात साजरा करण्यात आला. शांता काकडे यांच्या हस्ते यावेळी झेंडावंदन करण्यात आले.

कार्यक्रमाला किरण काकडे,गणेश काकडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपक बाळसराफ, डॉ. शाळीग्राम भंडारी, टाटा कमिन्सचे प्रतिनिधी शब्बीर राय, अभिजीत जोशी, रोटरी क्लब एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, कंपनीच्या व्यवस्थापन विभागातील गिरीजा खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत संग्राम काकडे यांनी केले. दीपक बाळसराफ शब्‍बीर राय आणि अभिजित जोशी यांनी उपस्थितांना मनोगतामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या  शुभेच्छा दिल्या. संतोष खांडगे यांनी काकडे परिवाराने प्रगतीपथावर नेलेल्या क्रशर कंपनीचा आलेख आपल्या मनोगतात व्यक्त केला.

गिरीजा खांडेकर यांनी दोन वर्षाच्या लॉकडाउनच्या काळात नम्रता कंपनीने कुठेही आमच्या पगारात कपात न करता कंपनीच्या कामगारांच्या सर्वांगीण विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणला असे मत मनोगतात व्यक्त केले.

डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी विविध दृष्टांत, काव्यपंक्ती आणि शेरोशायरीच्या माध्यमातून कुटुंबाच्या हिता बरोबरच कंपनीचे हित कामगारांनी जपलं पाहिजे. कर्मचाऱ्यांनी कंपनी माझ्या आणि माझ्या परिवाराच्या अन्नदाता आहे याचं भान ठेवून कंपनीचे आपले संबंध जपले पाहिजेत असे मनोगतात स्पष्ट केले.

या कार्यक्रम प्रसंगी डॉ. इंगळे आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांच्या मदतीने कंपनीतील कर्मचाऱ्यांची आणि कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.तसेच गीतांजली या वाद्यवृंदाने राष्ट्रभक्तीपर गीते गाऊन कार्यक्रमाला बहार आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन जांभूळकर यांनी केले. तर वृषाली काकडे हिने उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!