केंद्रप्रमुख पदोन्नती मध्ये द्या दिव्यांग विषय शिक्षकांना 4% आरक्षण देण्यात यावे
महा.राज्य . अपंग कर्मचारी संघटनेतर्फे मा शिक्षणाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 जिल्हा -शाखा अमरावतीच्या वतीने मा.ए झेड खान शिक्षणाधिकारी (प्रा) जिल्हा परिषद अमरावती यांना दिव्यांग कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले.यावेळी शिक्षण विभागातील राजेंद्र काळे वरीष्ठ लिपिक हे सुध्दा उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र दिक्षित, जिल्हासचिव श्री किशोर मालोकार, जिल्हाउपाध्यक्ष सौ शालिनी बोरखडे,कोषाध्यक्ष श्री युवराज थोरात आदी संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.यावेळी संघटनेचे दिव्यांग कर्मचारी यांना (4%)चार टक्के प्रमाणे पदोन्नती देण्यात यावी, दिव्यांग शिक्षकांची स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी दरवर्षी प्रसिद्ध करण्यात यावी, दिव्यांग कर्मचारी यांना सहायक तंत्रज्ञान साधने त्वरित उपलब्ध करून द्यावीत आदी विषयावरील प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले. यावर मा.शिक्षणाधिकारी ए झेड खान साहेब व राजेंद्र काळे वरीष्ठ लिपिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी कार्यालय अमरावती यांनी सकारात्मकता भुभिका दाखविली.