ताज्या घडामोडी

आदर्शमाता प्रतिष्ठान चे कार्य कौतुकास्पद: सरपंच सौ. आशामा मुजावर यांचेकडून प्रतिष्ठानचे कौतुक

Spread the love

सामाजिक संस्थांकडून आणि संघटनांकडून काही वेळा ध्येय आणि उद्देश बाजूला ठेवले जातात, परंतु आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने खरंच सामाजिक बांधिलकी अविरत जपली आहे, असे प्रतिष्ठानचे कौतुक पाडळी (केसे) गावच्या सरपंच सौ.आशामा शपिक मुजावर यांनी केले.

पाडळी (केसे) येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त गुणवंतांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.

पाडळी(केसे) तालुका कराड येथील निरंजन प्रकाश वाडकर आणि अनुश्री नरेंद्र व्हावळ या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल पाडळीच्या सरपंच सौ. आशामा शपिक मुजावर आणि उपसरपंच सलीम तुराब मुजावर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदर्शमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष मन्सूर पटेल, पाडळी( केसे) ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर, आदर्शमाता प्रतिष्ठान चे अनिल बडेकर, संपतराव मोहिते, पाडळी (केसे) चे पोलीस पाटील सरफराज शेख, प्रतिष्ठानचे तालुका कार्यकारिणी सदस्य जब्बार मुजावर,सातारा तालुका प्रतिनिधी संतोष भिंगारदेवे प्रकाश वाटकर, नरेंद्र वावळ, यांची उपस्थिती होती. स्वागत आणि प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्‍वास मोहिते यांनी केले तर आभार तंटामुक्तीचे उपाध्यक्ष मन्सूर पटेल यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!