ताज्या घडामोडी

पालघर येथे इनरव्हील क्लब चा स्तुत्य उपक्रम

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान मानले जाते. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली असं म्हणतात.अन्नदान करणारा शिवलोकात जातो. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते, जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वछ होऊन पाण्याचा साठाही वाढतो.

संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल.अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समजला जातो.

याचा खराखुरा प्रत्यय पालघर येथे आला. येथील इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती पाटील आणि त्यांच्या सहकारी संपदा काशीकर यांनी पुढाकार घेऊन पालघर येथील ताराबाग- गणेश हॉस्पिटल भागामध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी असलेल्या सुमारे 20 ते 25 मजुरांना अन्नदान करून एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे. मोलमजुरी करणाऱ्या या लोकांना मिष्ठान्न भोजन मिळाल्याने तसेच आकर्षक भेटवस्तू मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची अर्थातच समाधानाची छटा दिसत होती. या उपक्रमामुळे इनरव्हील क्लब चे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!