ताज्या घडामोडी

माधवराव पाटील महाविद्यालयामार्फत राष्ट्रीय वेबिणार संपन्न

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. १२ (प्रतिनिधी)

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालय व आयक्यूएसी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेबसाईट डेव्हलपमेंट अकॉर्डिंग टू नँक या विषयावर राष्ट्रीय वेबिणारचे बुधवारी (ता. १२) रोजी आयोजन करण्यात आले. या वेबिणारसाठी पुणे येथील आयक्यूएसी क्लस्टरचे संचालक डॉ. हिमांशु चौरे व डॉ. स्नेहा कदम यांनी ऑनलाइन झूमच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. प्रारंभी डॉ. स्नेहा कदम यांनी वेबसाईट डेव्हलपमेंट कसे करावे, त्याचबरोबर हे करणे का आवश्यक आहे. याची माहिती दिली कारण येणाऱ्या काळात आपल्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय मूल्यांकन करायचे असल्यास आपल्या महाविद्यालयातील सर्व माहिती अद्यावत असणे गरजेचे आहे. यामध्ये ई लर्निंग, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, शॉर्ट टर्म कोर्स केलेल्या प्राध्यापकांची माहिती अद्यावत करणे गरजेचे आहे. याचबरोबर महाविद्यालयात होणारे कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल. याबाबत केलेले नियोजन याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. व्हाईट कोड वेबसाईटच्या माध्यमातून आपले महाविद्यालय अद्यावत करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या वेबिणारचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विनायक रासुरे यांनी केले. मनोगत व अतिथींचे स्वागत प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी केले. या वेबिणारसाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सहभाग घेऊन या वेबिणारचा फायदा घेतला. वेबिणार यशस्वी करण्यासाठी आयोजक डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. महेश मोटे, प्रा. दयानंद बिराजदार, प्रा. अनिल हेबळे, डॉ. राजेंद्र गणापुरे, डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. लक्ष्मण पवार आदींनी परिश्रम घेतले. वेबिनारचे सुत्रसंचालन व आभार डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी मांनले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!