ताज्या घडामोडी

भाजपा नगरसेवक बाळा तावडे यांचे कार्यालयात ई श्रम कार्ड नोंदणी आभियान संपन्न.

Spread the love

भारत कवितके मुंबई.
कांदिवली येथील वार्ड क्रमांक २० चे नगरसेवक व चारकोप विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे यांचे कार्यालयात ई श्रम कार्ड नोंदणी आभियानचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा कांदिवली चारकोप विधानसभा आमदार योगेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक व चारकोप विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे यांचे वार्ड क्रमांक २० मध्ये एकूण सात वेळा ई श्रम कार्ड नोंदणी आभियानचे आयोजन करण्यात आले होते.

 

या अभियानाला विभागातील पुरुष व महिला वर्गांनी भरघोस प्रतिसात दिला.या वेळी २५० जणांनी ई श्रम कार्ड नोंदणी केली. या मध्यें कामगार,घरेलु महिला,माथाडी कामगार ,सुरक्षा रक्षक,आदिनी सहभाग घेतला.या वेळी विधानसभा महामंत्री योगेश पडवळ,वार्ड अध्यक्ष आर .एस .वर्मा,मुकेश चौधरी,विवेक हडकर,रुपाली चाळके,सीमा राणे,विशाल राणे,गजानन, समसुद्दीन चौधरी,धर्मेन्द्र वारे,यांनी या आभियान करीता विशेष परीश्रम घेतले.
भारत कवितके मुंबई. मोबाईल ८६५२३०५७००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!