ताज्या घडामोडी

सर्जेराव नाईक बँकेचे खातेदारांना ७२ कोटी परत – आ. मानसिंगराव नाईक.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

सर्जेराव दादा नाईक बँक बंद झाली हे सर्वांना माहीत आहे मात्र या बँकेतील शेतकरी, सभासद आदींचे पैसे मिळावे यासाठी आपण गेली सहा महिने केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. दोन टप्प्यात आत्तापर्यंत ७२ कोटी रुपयांचा निधी विमा संरक्षण अंतर्गत खातेदाराच्या त्यांनी दिलेल्या बँके खात्यावर जमा झाले आहेत , असे आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी उपनिबंधक डी एस खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले की , सभासद , उसउत्पादक शेतकरी, सामान्य नागरिक यांचे पैसे अडकले आहेत. हे पैसे मिळावेत यासाठी आपण अर्थमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील , रिझर्व्ह बँकेचे पदाधिकारी आदींच्या कडे पाठपुरावा केला होता. यास यश आले असून बँकेकडे पैसे अडकलेल्या खातेदारांनी रीतसर पैसे मागणीसाठी अर्ज केले आहेत तसेच लागणारी कागदपत्रे जोडली आहेत त्या खातेदाराच्या त्यांनी दिलेल्या इतर बँक खात्यात पैसे जमा करणेत येत आहेत.
एकूण ८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव विमा संरक्षण अंतर्गत पाठवला आहे.७२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत यापैकी पहिल्या टप्प्यात १९ हजार खातेदाराच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात ३९ कोटी रुपये जमा करण्यात आले होते तसेच दुसऱ्या टप्प्या अखेर ७२ कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे , असे शेवटी सांगितले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील , पांडुरंग कुंभार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!