ताज्या घडामोडी

वासगाव येथे बस स्थानक इमारतीचे भूमिपूजन नागोठणे विभागाचे नेते श्री.शिवराम शिंदे व श्री.भाई साहेब टक्के यांच्याहस्ते पार

Spread the love

प्रतिनिधी :- श्री महेश झोरे

कोकणचे भाग्यविधाते, रत्नागिरी रायगड चे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मा.शी.सुनिलजी तटकरे साहेब यांच्या आशीर्वादाने,रायगड च्या पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे व तरुणांचे आधारस्तंभ तसेच प्रेरणास्थान श्री.अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाने आमदारांचा स्थानिक कार्यक्रम सण 2020-21 मधून अनिकेत भाई यांच्या आमदार निधीतून मौजे- वासगाव येथे बस स्थानक बांधणे रक्कम 3 लक्ष ह्या कामाचे भूमिपूजन नागोठणे विभागाचे नेते शिवराम भाऊ शिंदे व भाई साहेब टक्के यांच्या शुभहस्ते पार पडले. ह्या प्रसंगी उपस्थित पेण सुधागड मतदार संघाचे उपाद्यक्ष विलास चौलकर, नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय अद्यक्ष संतोष भाई कोळी, कार्याध्यक्ष सचिन कळसकर,माजी सरपंच झिमाशेठ कोकरे,जाणू कोकरे,रोहिदास हातलोणकर ,ग्रामपंचायत सदस्या , ज्योती बोडेकर , मिना दरवडे, जगदीश दिवेकर, बाळकृष्ण देवरे,चंद्रकांत बावदाने, हरेश झोरे, हरेश कोकरे, राम झोरे,धोंडु बोडेकर,व वासगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!