ताज्या घडामोडी

जाकादेवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Spread the love

जाकादेवी/वार्ताहर

रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे धडाडीचे व उपक्रमशील चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सचिव व मालगुंड विद्यालयाचे सी.ई.ओ. विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, संचालक व जाकादेवी हायस्कूलचे सी.ई.ओ. किशोर पाटील, संस्थेचे सल्लागार नंदकुमार साळवी, मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर,तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीशैल्य पुजारी,आगरनरळ विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण जाधव ,विल्ये हायस्कूलचे भानुदास देशमुख,पोचरीचे पांडुरंग पानगले,धामणसेचे दत्तात्रय गायकवाड, मुलुंड येथील वझे-केळकर ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक अमोल पवार ,काजुर्लीचे मुख्याध्यापकदिनेश पवार,,चाफे विद्यालयाचे श्री.धनावडे, ,प्रतिक देसाई, यांसह परिसरातील माध्यमिक शाळांचे प्रतिनिधी, शिक्षक,पालक, हितचिंतक,बक्षीसपात्र विद्यार्थी, हितचिंतक उपस्थित होते.
सन 2019-20 व सन 2020-21 या दोन्ही शैक्षणिक वर्षातील पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या शाळांना जाकादेवी केंद्राची बहुमानाची फिरती ढाल संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.दहावी-बारावी केंद्र स्तरावरील तसेच शालेय स्तरावरील यशवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक, कर्मचारी, आदर्श विद्यार्थी इ.ना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कमेची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, सहाय्यक शिक्षक अमित बोले, सुशांत लाकडे यांनी केले.या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर, सचिव विनायक राऊत, संचालक किशोर पाटील, श्रीशैल्य पुजारी ,पालकांच्या वतीने दिगंबर घवाळी,तर विद्यार्थी वर्गाच्या वतीने आदर्श विद्यार्थिनी योगिनी साळवी (काजुर्ली) इत्यादींनी मनोगते व्यक्त केली. कोरोना संसर्गावर मात करून विद्यार्थ्यांनी आपले उच्चतम ध्येय साध्य करण्यासाठी सदैव कार्यप्रवण राहण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.मालगुंड,जाकादेवी परिसरातील दूरच्या गावातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून स्कुल बस सुरू करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून तसा ठराव वार्षिक सभेत संमत केला असल्याचे बंधू मयेकर यांनी यावेळी सांगितले. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी संतोष पवार यांनी सूत्रसंचालन तर आभार भूपाळ शेंडगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!