ताज्या घडामोडी

कांदिवली मध्ये शिवसेना शाखा क्रमांक २० व्दारा भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

Spread the love

भारत कवितके मुंबई.
मुंबई मधील कांदिवली पश्चिम उपनगरात हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षीही शिवसेना शाखा क्रमांक २० व धर्मवीर मित्र मंडळ कांदिवली यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२रोजी सह्याद्रि नगर कांदिवली पश्चिम येथे सदर रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या प्रसंगी या विभागातील अनेक पुरुष व महिला वर्गांनी या रक्तदान शिबीरास भरघोस प्रतिसात देऊन रक्तदान केले. प्रबोधनकार ठाकरे रक्त पेढी व्दारा सदर रक्तदान शिबीरात रक्तदात्यांचे रक्तदान कार्य पार पडले. या प्रसंगी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे,उपविभाग प्रमुख राजन निकम,शाखाप्रमुख संतोष राणे,शाखाप्रमुख राजु खान,वार्ड २० चे शाखाप्रमुख अनंत नागम,उपशाखा प्रमुख लल्लनटॉप यादव,उपशाखा प्रमुख कुमार सुगावे, महिला उपविभाग संघटक प्रतिभा शिरकर,महिला शाखा संघटक आकांक्षाताई नागम,महिला उपशाखा प्रमुख सायली चुकदरे,महिला कार्यालयप्रमुख जया कदम,महिला उपशाखा संघटक आरती सापटे,रुपाली हरचिलकर,मिनाक्षी भंडारे,मेहता,सोलोमन आदि पुरुष व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
भारत कवितके मुंबई. मोबाईल ८६५२३०५७००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!