ताज्या घडामोडी

दहिगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेचा लातूर जिल्हा परिषद शाळांचा पॅटर्न म्हणून निवड

Spread the love

कोरपावली ता यावल, फिरोज तडवी, येथून जवळच असलेल्या दहिगाव ता यावल येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेचा लातूर जिल्हा परिषद शाळांचा पॅटर्न म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये शासन राबवित असतांना यावल तालुक्यातून निवड करण्यात आली आहे या पॅटर्न साठी शासनाच्या म्हणण्यानुसार लोकसहभागातून हा प्रयोग यशस्वी करण्याचा निर्धार शाळेतील शिक्षकांनी व ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला आहे यासाठी सुमारे दहा लाख रुपये निधी जमा करण्यात येणार असून शाळा एक मॉडेल करण्यात येण्याचे स्वप्न शिक्षकांनी बघितले आहे यासाठी ग्रामस्थांच्या मदतीची आवश्यकता आहे लातूर पॅटर्न हा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील दोन शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे यासाठी यावल तालुक्यातून दहीगाव डांभुर्णी या शाळांची निवड करण्यात आली आहे म्हणून ग्रामसभा घेऊन मुख्याध्यापिका सौ वैशाली पाटील यांनी तसेच शाळेचे शिक्षक धीरज तायडे यांनी ग्रामस्थांन समोर लातूर जिल्हा परिषद शाळेच्या बा ला उपक्रमांतर्गत शाळांच्या पी पी ती दाखवून माहिती दिली संपूर्ण गावाने एकत्र येऊन हा पॅटर्न यशस्वी साठी मदतीचे आवाहन केले आहे नियोजनबद्ध हा उपक्रम यशस्वी होणार आहे गुणवत्तापूर्ण व भरीव शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी या कामी बाला उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे या उपक्रमासाठी गावातून वर्गणी जमा करून मदत करण्याचे ठरविण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरणार आहे ग्रामसभेमध्ये या उपक्रमाला  देवीदास पाटील यांचे पासून सुरुवात करण्यात आली त्यांनी रंग काम करून देण्याचे म्हटले तर किशोर महाजन यांनी वैयक्तिक पाच हजार रुपये पर्यंत ची कामे करून देण्याचे आश्वासन दिले तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी एकवीस हजार रुपये तर माजी कृषी सभापती जिल्हा परिषद सुरेश देवराम पाटील यांनी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!