ताज्या घडामोडी

मलकापूर (ता.कराड ) येथील नगरपालिकाचे हद्दीतील सर्व्हिस रोडवरवरील नो पार्कींग झोन बाबत आवाहन

Spread the love

मलकापुर (कराड) नगरपालिका हद्दीत कोल्हापुर नाका ते गंधर्व हॉटेल व कोयना वसाहत ते कोल्हापूर नाका अशा दोन्ही सर्व्हिस रोडवर हॉटेल, हॉस्पिटल, पेट्रोलपंप, बँका, मंगल कार्यालये, गॅरेज आणि इतर आस्थापना आहेत. त्यापैकी कराड व आजूबाजूचे परिसरातून तातडीचे वैद्यकीय उपचारकामी आवश्यक असणारे पेशंट येत असतात. काही वेळेला सर्व्हिस रोडवरील वाहतूक कोंडीमुळे अत्यवस्त रुग्णाना उपचार मिळण्यास विलंब होतो असे निदर्शनास येत आहे.
कराड शहर ही मोठी बाजारपेठ असल्याने वाहनांची ये जा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे दोन्ही सर्व्हिस रोडवर कराड मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठया प्रमाणात असते. वाहनधारक आपली वाहने सर्व्हिस रोडवरच जागा मिळेल तिथे पार्क करून जातात त्यामुळे या दोन्ही सर्व्हिस रोडवर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पार्किंग केलेल्या वाहनांमुळे त्याठिकाणी झालेल्या वाहतुक कोंडीत छोटे-मोठे अपघात होवून वादावादीचे प्रसंग होत आहेत. तसेच या सर्व्हिस रोडवरील काही गॅरेज मालक त्यांचेकडे दुरुस्तीसाठी आलेली वाहने रोडवरच उभी करून दुरुस्ती करत असतात त्यामुळेही वाहतूक कोंडी होत असते.

सदर राष्ट्रीय महामार्ग क्रमाक 04 लगत सर्व्हिस रोडवर लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वेगवेगळया प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर पार्कींग केलेल्यावाहनांच्या आडोशाला व्यसनांचे अड्डे,अपघातास निमंत्रण, गाड्या, डिझेल, माल चोरी या घटना होत आहेत. पार्कींग केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होवून सामान्य जनतेस नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा भावना व्यक्त होत आहेत.
सदर करिता, कराड शहर पोलीस ठाणे, वानिशा कराड शहर व मलकापूर नगरपालिका यांच्या वतीने असे आवाहन करणेत येते की, “कराड शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 04 लगतच्या कोल्हापुर नाका ते गंधर्व हॉटेल व कोयना वसाहत ते कोल्हापूर नाका या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवर लावण्यात येणारी वाहने सर्व्हिस रोडवर पार्क करू नयेत. ”
सदरचे सव्हिर्स रोड हे पार्कींग तळ म्हणून गणली जात नाहीत. यास्तव दि.24/01/2022 रोजी पासून सदर ठिकाणी लावण्यात येणाऱ्या वाहनांच्यावर पोलीस प्रशासनाचे बेकायदा पार्कींग संदर्भाने वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, याची सर्वांनी नांेद घ्यावी.
याबाबत कोणास वेगळे काही सुचवायचे असल्यास कृपया लेखी अर्जाव्दारे कराड शहर पोलीस ठाणे, वाहतुक निंयत्रण शाखा कराड व मलकापूर नगरपारिषद येथे लेखी कळवून पोहोच घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!