ताज्या घडामोडी

धनगर अधिकारी-कर्मचारी बांधवांनो कुटुंबात सडून मरण्या पेक्षा समाज चळवळीत लढून मरा… जेणे करून चार लोक आठवण तर काढतील

Spread the love

अशोक पातोंड धनगर
अकोट जिल्हा अकोला
9881667678
तुमचे,आमचे,सर्वांचे आदर्श म्हटल्या वर डोळ्या समोर दिसतात ते शिव छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पुण्यश्लोक लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,सम्राट अशोक,छत्रपती शाहू महाराज,वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,व ज्यांनी ज्यांनी आपल्या देशा साठी रक्त सांडले.असे सर्व थोर क्रांतिकारक,संत महंत आणि समाज सुधारक बरोबर ना…!!ह्या लोकांनी कधी आपल्या घरा-दाराचा,परिवाराचा,नातेवाईकांचा विचार केला का हो…??मूठभर मावळे घेऊन महाराष्ट्रात “हिंदवी स्वराज्य” निर्माण करणारे हिंदू हृद्यय सम्राट *छत्रपती शिवाजी महाराज…* हे आपल्या परिवारात गुंतले होते का….??स्वतःच्या परिवारा च्या अडचणी ते सोडवत बसले असते तर महाराष्ट्रात मराठे शाहीची क्रांती झाली नसती.ते जर कुटुंबात रमले असते तर “हिंदवी स्वराज्य” निर्माण झाले नसते.शिवाजी महाराजांनी स्वतःच्या परिवाराचा विचार न करता ध्येया साठी स्वतःला वाहून घेतले.त्या मुळेच जगात आजही महाराजांचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते.करोडो मावळे महाराजांच्या कार्यावर स्तुती सुमने वाहतांना आजही थकत नाहीत..शिवाजी महाराज की..म्हटल्या बरोबर आपोआप प्रत्येकाच्या मुखात..जय..शब्द आल्या शिवाय राहत नाही.कारण महाराजांचे कार्य हे कुटूंबा पूरते नव्हे तर समाजाच्या कल्याणा साठी होते.म्हणूनच आजही ते तुमचे आमचे आदर्श आहेत…स्त्री शिक्षणाची दारे तुमच्या आमच्य साठी खुले करून देणारे *महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती-ज्योती सावित्रीबाई फुले* यांना वाटत नव्हते का..??की आपल्या घरी कशाचीही कमी नसतांना आपण समाजा साठी कशाला वेळ द्यायचा…??पण नाही,त्यावेळी त्यांनी तसा जर स्वार्थी विचार केला असता तर आज दीडशे वर्षा नंतरही ते तुमचे आमचे आदर्श झाले नसते.त्यांच्या नावाने आज ज्या चळवळी सुरु आहेत त्या झाल्या नसत्या.आज अभिमानाने त्यांचे नाव घेतले जाते.कारण ते घरा-दाराच्या बंधना पासून अलिप्त होते.*डॉ.बाबासाहेब आंबेडकर* विदेशात शिक्षण घेत असतांना त्यांचा मुलगा मरण पावला.पण डॉ.बाबासाहेब त्यांच्या मुलाचे मयती ला सुद्धा विदेशातून घरी आले नाहीत…त्यांना वाटले नसेल का..??मुलगा मरण पावला,पत्नी एकटीच घरी आहे.तिला जाऊन आधार द्यावा.पण डॉ.बाबासाहेबांनी त्या दुःख प्रसंगी आपल्या परिवाराचा विचार केला नाही,तर समाजाचा विचार केला.म्हणून आज ते आमच्या हृदयावर आजही अधिराज्य गाजवित आहेत.आमच्या माय-बापाने तर फक्त आम्हाला जन्म दिला.पण खरे उपकार तर डॉ.बाबासाहेबां च्या त्यागाचे,संघर्षाचे आणि कष्टाचे आमच्या वर आहेत…कारण आमच्या हक्का साठी त्यांनी स्वतःच्या परिवाराचा विचार न करता समाजातील वर्षा-नुवर्षे चालत आलेल्या वाईट रूढी,परंपरेला मातीत गाडून आम्हाला स्वातंत्र्याची चव चाखायला दिली…म्हणूनच ते आज आमचे आदर्श आहेत.*पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर* एक महिला असून सुद्धा त्यांच्या कुटुंबातील सासरे मल्हारराव,पती खंडेराव,मुलगा मालेराव,मुलगी मुक्ता,आणि कुटुंबातील सर्व व्यक्ती मृत्यू पावल्या नंतर सुद्धा त्यांनी स्वबळावर आणि स्वतःच्या मनगटाच्या जोरावर एक नाही तब्बल 28 वर्ष होळकर साम्राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळून जगातील एकमेव महिला राज्यकर्त्या म्हणून किर्तीमान झाल्या नसत्या.*धनगर पुत्र सम्राट अशोक* बाबत सांगायचे झाल्यास ज्यांचे अख्या आशिया खंडावर राज्य होते.भारतीय चलनात आजही त्यांच्या नावाने नोटांवर व भारतीय तिरंगा ध्वजवर राजचिन्ह(अशोक चक्र)नसते.त्यांच्या नावाने सेना दलाचा सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्र म्हनून दिल्या गेले नसते. *संत गाडगे बाबां* बद्दल बोलायचे झाल्यास,गाडगे बाबा दिवसभर गावातील कचरा साफ करून रात्री लोकांच्या डोक्यातील घाण साफ करायचे.त्यांचे कीर्तन ऐकण्या साठी जगातील एक नंबरचा विद्वान व्यक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुद्धा खाली बसायचे.वैराग्यमूर्ती गाडगे बाबा एकदा कीर्तन करीत असतांना त्यांना त्यांच्या मुलाच्या निधनाची वार्ता समजली.पण मुलाच्या निधनाची वार्ता ऐकुन ते रडत न बसता लोकांना प्रबोधन करीत राहिले आणि कीर्तनातून म्हणाले “असे गेले कोट्यान-कोटी कशाला रडू मी एकट्या(मुला बाबत)साठी”….त्यावेळी कीर्तन जाऊ दे,म्हणून गाडगे बाबा घरी गेले असते,तर अशिक्षित असलेल्या गाडगे महाराज यांचे नाव अमरावती विद्यापीठाला मिळाले नसते.सरकारने त्यांच्या नावाने “ग्राम स्वच्छता अभियान” सुरू केले नसते.अशा कित्येक महापुरुषांचे नाव आणि त्यांचे कार्य आम्हाला का माहित आहेत..तर ते कधीही स्वतः पुरते व आपल्या बायका-लेकरांचा अर्थात कुटुंबाचा विचार न करता समाजाच्या कल्याणा साठी झटले.त्यांच्याच पुण्याईने आम्ही आज सन्मानाचे जीवन जगत आहोत..त्यांच्याच विचाराचा प्रभाव आमच्या वर पडला आहे.पण वांदा असा आहे की,वरील सर्व आमचे आदर्श असले तरीही त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन आम्ही कार्य करतांना दिसत नाही.हिच शोकांतिका आहे…..तुम्हाला साधा प्रश्न केला की,तुमच्या आज्याच्या आज्याच नाव काय आहे..??फुस्स्स….माहित नाही. तुम्हाला तुमच्या 3 ऱ्या पिढी मधील लोकांचे नाव माहित नाही.पण शेकडो,हजारो वर्षां पूर्वी जन्मलेल्या वरील सर्व महामनवांचे नुसते नावच माहित नाही,तर त्यांचे विचार आणि शिकवण आजही तुमच्या आमच्या आचरणात आहे….मग जरा विचार करा फक्त कुटुंबां पुरते जगणाऱ्या धनगर अधिकारी-कर्मचारी बांधवांनो,समाजातील बुद्धिजीवी लोकांनो तुम्हाला आज्याच्या आज्याच नाव माहित नाही… कारण आपण घराच्या बंधनातून कधी बाहेरच पडलो नाही.पण आमचे महापुरुष हे स्वतःच्या परिवाराचा विचार न करता समाजाच्या उन्नती साठी झिजले.झटले तेच आमच्या आदर्शच्या पंक्तीत विराजमान होते,आहेत आणि राहणार….म्हणून माझी धनगर समाजातील फक्त कुटुंबा पुरते जगणाऱ्या धनगर अधिकारी-कर्मचारी बांधव,बुद्धिजीवी समाज बांधवांना हात जोडून विनंती करतो की,केवळ कुटुंबात सडून मरण्या पेक्षा,समाज चळवळीत लढून मरा..आणि स्वतःचे अस्तित्व असे निर्माण करा की,आपण मेल्यावर निदान चार लोकांनी आपले नाव घेतले पाहिजे….कारण हे जग म्हणजे केवळ कुटुंब नव्हे…
बघा करा विचार…तुम्ही आम्ही सर्व मिळून समाजाला एका चांगल्या दिशेने नेऊ या.
धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!