ताज्या घडामोडी

रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाल्याने ती नियंत्रणात आणावी अन्यता तीव्र आंदोलन

Spread the love

यावल ( प्रतिनिधी ) –
केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाल्याने ती नियंत्रणात आणावी अन्यता तीव्र आंदोलन करण्यात येईल, यावल तहसीलदार श्री महेश पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन। यावल प्रतिनिधी फिरोज तडवी
गेल्या काही वर्षात रासायनिक खतांच्या किमतीत वारंवार प्रचंड वाढ होत असल्याने शेतकरी डबघाईस येत आहेत केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या खत व कृषी मंत्रालयाने भाव वाढीवर नियंत्रण आणावे अन्यथा राष्ट्रवादी तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार महेश पवार यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या खते व कृषी मंत्रालयाच्या नियंत्रणातील विविध खाजगी व शासकीय खत कंपन्यांद्वारे गेल्या काही महिन्यात खताच्या किमतीत प्रचंड वाढ करीत आहे ही दरवाढ शेतकऱ्यांना जीवघेणी ठरत आहे युरिया व डीएपी वगळता मिश्र खतांमध्ये प्रचंड भाव वाढ केली असून चार महिन्यात सुमारे 70 टक्के एवढी वाढ केली आहे त्याच प्रमाणे मिश्रखतामध्ये 40 टक्के वाढ करण्यात आली आहे उत्पादन योग्य भाव मिळत नसल्याने आलेला असताना खतामध्ये होत असलेल्या प्रचंड वाढ मुळे ही वाढ जीवघेणी ठरत आहे शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय केंद्र सरकारने त्वरित थांबवावा अन्यथा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल अशा आशयाचे निवेदन येथील तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आली आहे निवेदनावर तालुकाध्यक्ष, प्रा मुकेश येवले ,विजय प्रेमचंद पाटील, गिरधर पाटील ,दिनकर सिताराम पाटील, अतुल वसंतराव पाटील , एम. बी. तडवी, डॉ हेमंत येवले ॲड. देवकांत पाटील ,विकास पाटील, पवन पाटील, अब्दुल सईद भाई ,वसंत पाटील, ललित पाटील ,बापू जासूद, निवृत्ती धांडे, दत्तु पाटील ,भास्कर पाटील समाधान पाटील,राहुल चौधरी,भागवत अटवाल नरेंद्र पाटील ,गोलु माळी,नाना सोनवणे , अययुब खान ,धीरज कुरकुरे, गणेश सोनार ,अनवर खाटीक ,करीम मनयार ,चंद्रकांत येवले ,आत्माराम शंकोपाळ ,मोसिन शेख फारुख मुंशी ,धिरज पाटील,सौ .प्रतिभा निळ सौ . नीलिमा धांडे,ममता आमोदकर ,उजवला महाजन ,सोनु पाटील अशोक भालेराव,याकुब तडवी,कामराज घारु तुशार येवले, निलेश बेलदार ,अरुण लोखंडे ,ललित तेली विजय साळी भगवान बरडे पितांबर महाजन,किशोर तायडे, शेख जुनेद, हेमंत भगत यांचेसह सुमारे 50 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!